साखरपुड्याआधी नाल्यात पडली लेकीची 1.16 कोटींची अंगठी; वडिलांनी केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:21 PM2024-01-24T16:21:14+5:302024-01-24T16:28:36+5:30
जेव्हा मुलीची एंगेजमेंट रिंग नाल्यात पडली, तेव्हा वडील आपल्या मुलीसोबत होते.
चीनमधील गुआंग्दोंग प्रांतातील हुआंगगन शहरात वडिलांकडून त्यांच्या मुलीची अंगठी नाल्यात पडली. या अंगठीची किंमत 1.16 कोटी रुपये होती. यानंतर वडिलांनी मुलीची अंगठी शोधण्यासाठी एक टीम नियुक्त केली. चार दिवसांच्या मेहनतीनंतर अंगठी परत मिळवण्यात मोठं यश मिळालं आहे. हिऱ्याची अंगठी असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
जेव्हा मुलीची एंगेजमेंट रिंग नाल्यात पडली, तेव्हा वडील आपल्या मुलीसोबत होते. वडिलांना माहिती मिळताच त्यांनी लवकरात लवकर शोध घेण्यासाठी एक टीम तयार केली. वडिलांना अंगठी नाल्यात पडली असावी असं वाटलं. अनेक तास शोध घेऊनही मौल्यवान अंगठी सापडली नाही. मात्र, कोणीही हार न मानता अंगठीचा शोध सुरूच ठेवला.
अंगठी शोधण्यासाठी टीमने रात्रंदिवस काम केलं. यामुळेच चार दिवसांनी अंगठी शोधण्यात टीमला यश आलं आहे. टीमने नाल्यात खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच चार दिवसांत अंगठी सापडली. चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर टीमला अंगठी मिळाली.
हिऱ्याची अंगठी होती. वडिलांनी खास आपल्या मुलीसाठी ही अंगठी बनवली होती. अंगठी मिळाल्याने वडिलांना मोठा दिलासा मिळाला. त्याबद्दल त्यांनी टीमचे खूप आभार देखील मानले. संयम आणि समर्पणाने कोणतेही ध्येय गाठता येते हे या घटनेतून दिसून येतं.