वेदनादायी! कोरोना पॉझिटिव्ह वडिलांना पाणी देण्यापासून आईने मुलीला रोखलं; तळमळत प्राण सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 11:03 AM2021-05-05T11:03:09+5:302021-05-05T11:13:02+5:30
Corona News : या व्हिडीओत बघायला मिळतं की, मुलगी आपल्या वडिलांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिची आई तिला रोखत आहे. यानंतर मुलीला रडू आवरत नाही.
देशात कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट थैमान घालत आहे. अशात अनेक वेदनादायी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video)झाला आहे. ज्यात एक मुलगी आपल्या कोरोना पॉझिटिव्ह वडिलांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची आई तिला रोखत आहे.
या व्हिडीओत बघायला मिळतं की, मुलगी आपल्या वडिलांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिची आई तिला रोखत आहे. यानंतर मुलीला रडू आवरत नाही. या व्यक्तीचं वय ५० असून तो विजयवाडा येथील कंपनीत काम करत होता. कोरोना संक्रमित असूनही तो श्रीकाकुलम या आपल्या गावी आला होता.
या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला गावाबाहेरील एका झोपडीत राहण्यास भाग पाडण्यात आलं. त्याचा व्हिडीओ गावातीलच एका व्यक्तीने बनवला. व्हिडीओत बघायला मिळतं की, मुलगी तिच्या कोरोना पॉझिटिव्ह वडिलांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिची आई तिला रोखते. कारण तिला भीती असते की, मुलीलाही कोरोनाची लागण होऊ नये.
यानंतर काही वेळातच ही व्यक्ती जमिनीवर पडली. ज्यानंतर मुलीने वडिलांना पाणी पाजलं. व्हिडीओ बनवत असलेल्या व्यक्तीने सांगितले की, या व्यक्तीला उपचारााठी हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. ज्यामुळे त्याचा उपचाराविनाच मृत्यू झाला. अशी माहिती मिळते की, नंतर परिवारातील सगळे लोक कोरोना संक्रमित झाले.