ॲटोच्या धडकेत महिलेचा मृत्यू स्टेशन जवळील धटना : चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
By Admin | Published: September 3, 2015 09:44 PM2015-09-03T21:44:40+5:302015-09-04T00:40:57+5:30
लातूर: शहरातील रेल्वे स्टेशन ते लातूर रोडवर एका ॲटोचालकांने आपल्या ताब्यातील वाहन हायगयीने व निष्काळजीपणे चालवुन एका महिलेसह मुलास धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले असून उपचारादरम्यान सदरील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली़ लातूर तालुक्यातील कासारजवळा येथील कमलबाई गायकवाड व श्रुषीकेश नावाचा मुलगा लातूर रेल्वेस्टेशनवरून पायी जात असतांना एका ॲटोचालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवुन धडक दिल्याने ते दोघेही गंभीर जखमी झाले़उपचारादरम्यान कमलबाई गायकवाड या महिलेचा बुधवारी मृत्यू झाला आहे़या प्रकरणी किशन सवासे रा़कासारजवळा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात कलम ३७९,३३७,३३८,३०,४ (ए)भादवीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी ॲटोचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़