पाचव्या लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून केला वडिलांचा खून

By admin | Published: July 4, 2017 09:50 PM2017-07-04T21:50:15+5:302017-07-04T21:50:43+5:30

उत्तर प्रदेशमध्ये एका तरूणाने आपल्या वडिलांनी लग्नासाठी पैसे न दिल्याने त्यांचा खून केल्याची घटना

Daughter's father murdered for not paying the fifth marriage | पाचव्या लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून केला वडिलांचा खून

पाचव्या लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून केला वडिलांचा खून

Next
>ऑनलाइन लोकमत
सीतापूर, दि. 4 - उत्तर प्रदेशमध्ये एका तरूणाने आपल्या वडिलांनी लग्नासाठी पैसे न दिल्याने त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे. येथील सीतापूर जिल्ह्यातील या तरूणाला वडिलांनी पाचव्यांदा लग्न करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला होता. 
 
येथील देवरी खुर्द गावातील ही घटना आहे. सोमवारी संध्याकाळी अशोक नावाच्या तरूणाचं आपले वडिल इंदल(70) यांच्यासोबत वाद झाला होता. अशोकचं चार वेळेस लग्न झालं मात्र दारूच्या व्यसनामुळे त्याचं एकही लग्न टिकू शकलं नाही.  त्यामुळे त्याला पाचव्यांदा लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याने वडिलांकडे पैशाची मागणी केली मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले पण अशोक घरातून पळून गेला होता.  
 
त्याच रात्री दारूच्या नशेमध्ये अशोक घरी परतला. त्यानंतर त्याने वडिलांसोबत पुन्हा हुज्जत घालायला सुरूवात केली. मध्यस्थी करण्याचा प्रय़त्न करणा-या भावाला व त्याच्या पत्वनीलाही अशोकने मारहाण केली. त्यानंतर त्याने वडिलांवर लोखंडी रॉडने वार करून त्यांचा खून केला व फरार झाला. 
 
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली असून अशोकला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

Web Title: Daughter's father murdered for not paying the fifth marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.