शहीद जवानांच्या मुलींना बिहारमधील महिला जिल्हाधिकारी घेणार दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:46 AM2019-03-04T04:46:50+5:302019-03-04T04:47:08+5:30
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या चाळीस जवानांमध्ये समावेश असलेल्या बिहारच्या दोन सीआरपीएफ जवानांच्या प्रत्येकी एका मुलीला शेखपूराच्या महिला जिल्हाधिकारी इनायत खान यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शेखपूरा : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या चाळीस जवानांमध्ये समावेश असलेल्या बिहारच्या दोन सीआरपीएफ जवानांच्या प्रत्येकी एका मुलीला शेखपूराच्या महिला जिल्हाधिकारी इनायत खान यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला
आहे.
रतनकुमार ठाकूर व संजयकुमार सिन्हा अशी या शहीद जवानांची नावे आहेत. त्यांच्या दोन मुलींच्या आर्थिक मदतीसाठी शेखपूरा येथील बँकेत खातेही उघडण्यात आले आहे. बिहार केडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या इनायत खान यांनी सांगितले की, या दोन मुलींचे शिक्षण व अन्य बाबींच्या खर्चाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. शेखपूरा जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला दोन दिवसांचा पगार शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी देऊ करावा असे आवाहन इनायत खान यांनी केले आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शनिवारी एका कार्यक्रमात इनायत खान व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी श्रद्घांजली अर्पण केली.