महिला दिन स्पेशल: मोदी सरकारच्या 'या' योजनेतून मुलींना मिळणार १५ लाख! कसे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:37 PM2023-03-08T12:37:55+5:302023-03-08T12:40:16+5:30

Sukanya Samriddhi Yojana : जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून चांगला फंड तयार करू शकता.

daughters will get 15 lakhs from sukanya samriddhi yojana of modi government | महिला दिन स्पेशल: मोदी सरकारच्या 'या' योजनेतून मुलींना मिळणार १५ लाख! कसे? जाणून घ्या...

महिला दिन स्पेशल: मोदी सरकारच्या 'या' योजनेतून मुलींना मिळणार १५ लाख! कसे? जाणून घ्या...

googlenewsNext

Sukanya Samriddhi Yojana : जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून चांगला फंड तयार करू शकता. कारण महिलांना आर्थिक समानता, स्थैर्य आणि स्वातंत्र्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. हा दिवस जागतिक स्तरावर अशा महिलांकडे लक्ष वेधून घेतो ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि ज्यांनी त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अशा अनेक योजना आहेत ज्या महिलांना त्यांच्या भविष्याचे नियोजन करण्यास मदत करू शकतात आणि महिलांना दीर्घकालीन लाभ देऊ शकतात.

जर महिलांना आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर ८ मार्च रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्या आपल्या मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत चांगली गुंतवणूक सुरू करू शकतात. यामुळे मुलींबाबत महिलांच्या काही चिंता दूर होतील. हा पैसा महिला आपल्या मुलीचे शिक्षण, लग्न आणि इतर कामांसाठी वापरू शकतात. त्यामुळे एका आईच्या खांद्यावरील ओझंही खूप कमी होईल.

बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते
सुकन्या समृद्धी योजना (SSY) २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. ही एक बचत योजना आहे जी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पालक त्यांच्या मुलीसाठी अधिकृत व्यावसायिक बँक किंवा इंडिया पोस्ट शाखेत बचत खाते उघडू शकतात. SSY खात्यांसाठी व्याज दर ७.६% आहे. तुमची गुंतवणूक आणि कार्यकाळ यावर आधारित तुमच्या रिटर्न्सची गणना करण्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर वापरू शकता. 

सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता

  • या योजनेच्या लाभासाठी मुलगी भारतीय नागरिक असावी.
  • मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • सुकन्या समृद्धी योजना खाते प्रत्येक कुटुंबातील दोन मुलींसाठीच उघडता येते.


अशा प्रकारे सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मोजा
एखादी व्यक्ती सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्र ठरल्यानंतर, त्यांनी मुलीचे वय आणि कॅल्क्युलेटरमध्ये आवश्यक गुंतवणूक रक्कम नोंद केली पाहिजे. किमान आणि कमाल योगदान अनुक्रमे रु २५० आणि रु. १.५ लाख आहे. उदाहरणार्थ, तुम्ही संपूर्ण वर्षासाठी (अंदाजे) ८,३३३ रुपये मासिक गुंतवता जे १० वर्षांसाठी ७.६% व्याज दरासह अंदाजे १,००,०० रुपये होतात. ज्याचे तुम्हाला मॅच्युरिटीवेळी १५,२९,४५८ रुपये व्याजासह मिळतील.

Web Title: daughters will get 15 lakhs from sukanya samriddhi yojana of modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.