दाऊदची सुरक्षा वाढविली...
By admin | Published: November 3, 2015 02:43 AM2015-11-03T02:43:09+5:302015-11-03T02:43:09+5:30
अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतासाठी मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा जानी दुश्मन छोटा राजनला इंडोनेशियात जेरबंद करण्यात आल्याने पाकिस्तानी लष्कराने दाऊदला
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतासाठी मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा जानी दुश्मन छोटा राजनला इंडोनेशियात जेरबंद करण्यात आल्याने पाकिस्तानी लष्कराने दाऊदला कडेकोट सुरक्षा पुरविली आहे. दाऊदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी लष्काराचे खास कमांडो दाऊदच्या कराची आणि इस्लामाबादस्थित घराभोवती तैनात करण्यात आले आहेत.
गुप्तचर विभागाच्या हवाला देत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९३मधील मुंबईतील भीषण साखळी बॉम्बस्फोटांनंतर दाऊद इब्राहिम गेल्या २० वर्षांपासून कराची आणि इस्लामाबादेत राहत आहे. हे जगजाहीर असताना तसेच भारताने दाऊद पाकिस्तानातच दडी मारून असल्याचे सज्जड पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तान मात्र काखा वर करीत दाऊद पाकिस्तानात नसल्याचे सांगत आहे. एवढेच नाहीतर दाऊदच्या भारतातील गुन्हेगारी कारवायांबाबत पुराव्यानिशी
माहिती भारताने पाकला दिलेली
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
छोटा राजन पक्का वैरी
छोटा राजन एकेकाळी दाऊदचा अत्यंत विश्वासू सहकारी होता. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर दोघांचे बिनसले. छोटा राजन त्याचा पक्का वैरी बनला असून, २०००मध्ये दाऊदच्या साथीदारांनी बँकॉकमधील एका हॉटेलमध्ये गाठून छोटा राजनवर हल्ला केला होता. तथापि, या हल्ल्यातून छोटा राजन बचावला होता.