D कंपनीला अजमल कसाबची सुपारी मिळाली नव्हती, छोटा शकीलचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:49 PM2020-02-19T12:49:26+5:302020-02-19T12:55:00+5:30

माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ (Let me say it Now) या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे केले आहेत.

dawood ibrahim close aide chhota shakeel responds to claims made by rakesh maria | D कंपनीला अजमल कसाबची सुपारी मिळाली नव्हती, छोटा शकीलचा दावा

D कंपनीला अजमल कसाबची सुपारी मिळाली नव्हती, छोटा शकीलचा दावा

Next
ठळक मुद्दे26/11च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या अजमल कसाबसंबंधी त्यांनी पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगला अजमल कसाबला कोठडीत मारण्याची सुपारी मिळाली होती. पोलिसांनी ही माहिती सार्वजनिक होऊ दिली नाही, असा उल्लेख राकेश मारियांनी पुस्तकात केला आहे. दाऊदचा हस्तक राहिलेल्या छोटा शकीलनं खुलासा केला आहे. D कंपनीला कसाबची सुपारी मिळाली नव्हती. पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी राकेश मारिया धादांत खोटं बोलत आहेत, असा दावा छोटा शकीलनं केला आहे.

नवी दिल्लीः माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ (Let me say it Now) या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे केले आहेत. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या अजमल कसाबसंबंधी त्यांनी पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगला अजमल कसाबला कोठडीत मारण्याची सुपारी मिळाली होती. पोलिसांनी ही माहिती सार्वजनिक होऊ दिली नाही, असा उल्लेख राकेश मारियांनी पुस्तकात केला आहे. त्यासंदर्भात आता दाऊदचा हस्तक राहिलेल्या छोटा शकीलनं खुलासा केला आहे. D कंपनीला कसाबची सुपारी मिळाली नव्हती. पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी राकेश मारिया धादांत खोटं बोलत आहेत, असा दावा छोटा शकीलनं केला आहे.
 
News18 या वृत्तवाहिनीनं या संबंधीचं वृत्त दिले असून, छोटा शकीलनं त्यांच्याकडे हा खुलासा केला आहे. प्रसिद्धीसाठी त्यांनी मनाला वाट्टेल ते लिहिलं आहे. राकेश मारियांनी पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी खोट्या वृत्ताचा आधार घेतला आहे. प्रसिद्धीसाठी ते फक्त दाऊद इब्राहिमच्या नावाचा वापर करत आहेत. खरं तर डी गँगचा अजमल कसाबशी कोणताही संबंध नाही. डी गँगला कसाबच्या हत्येची कोणतीही सुपारी मिळालेली नव्हती. राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे की, कोठडीत कसाबला मारण्याची जबाबदारी डी गँगला मिळाली होती.

Rakesh Maria Book : "दाऊदने कसाबची सुपारी घेतलेली, पण त्याला जिवंत ठेवायचेच होते"

मारिया साहेबांच्या खोट्या विधानांसंदर्भात माझ्याकडे उत्तर नाही. जर ते भाईंच्या नावानं पुस्तकाचं प्रमोशन करत असतील तर गोष्ट वेगळी आहे. त्यांनी एखाद्या लहान मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की हे सर्व खरं आहे. जर त्यांनी असं केल्यास त्यावर विश्वास ठेवता येईल. परंतु ते तसं करणार नाहीत. ते खोट्या दावांनुसार बुक प्रमोट करत आहेत. मला यापुढे काहीही बोलायचं नाही.
 
Sheena Bora Murder Case : मारियांचे पुस्तकी दावे 'त्या' पोलीस अधिकाऱ्याने फेटाळले; पुस्तक खपासाठी मार्केटिंग

Video : Sheena Bora Murder Case : खळबळजनक! राकेश मारियांनी पुस्तकातून केला गौप्यस्फोट

आज हिंदुस्थानात कोण खोटं बोलत नाही. खालपासून वरपर्यंत खोटंच बोललं जातं. सर्वच्या सर्व खोटारडे आहेत. तुम्हाला सगळंच माहिती आहे, तुम्ही मीडियावाले आहात. आता राकेश मारिया खोटं बोलले तर त्यात काय नवीन गोष्ट आहे. कसाब हा आमचा विषय नाही. त्यामुळे आम्हाला ISI किंवा इतर कोणीही आदेश देऊ शकत नाही. अजमल कसाबच्या कोणत्याही प्रकरणात दाऊद इब्राहिम किंवा डी कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचंही छोटा शकीलनं स्पष्ट केलं आहे.  

Web Title: dawood ibrahim close aide chhota shakeel responds to claims made by rakesh maria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.