दाऊदची संपत्ती १२ लाख कोटींची! सध्या काय करतो, पैसा कुठून आणतो? सगळी कुंडलीच समजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 05:50 AM2023-01-22T05:50:57+5:302023-01-22T05:52:32+5:30
अंडरवर्ल्डचा डॉन आणि मुंबईसह भारतातील अनेक गुन्ह्यांत मोस्ट वॉण्टेड असलेल्या दाऊदची संपत्ती पोहोचली आहे, तब्बल १२ लाख कोटींवर.
आशिष सिंह, विशेष प्रतिनिधी
अंडरवर्ल्डचा डॉन आणि मुंबईसह भारतातील अनेक गुन्ह्यांत मोस्ट वॉण्टेड असलेल्या दाऊदची संपत्ती पोहोचली आहे, तब्बल १२ लाख कोटींवर. ड्रग्जचा धंदा, अनेक वस्तूंची चोरटी वाहतूक, खंडणी - धमकी, हवाला रॅकेट, बेनामी संपत्ती अशा मिळेल त्या गैरमार्गाने दाऊदने हा पैसा जमवला आहे. त्याच्या या अफाट, अतिप्रचंड संपत्तीचा वारस आहे, त्याचा मुलगा मोईन नवाज. तोच नव्हे, तर दाऊदच्या भावंडांची मुले, छोटा शकीलचा मुलगा, इकबाल कासकरचा मुलगा अशी या गुंडांची पुढची पिढी आता या काळ्या जगाचे अनभिषिक्त सम्राट बनण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाने पैसा कमावत आहेत.
मुंबईतील बॉम्बस्फोट, खंडणीचे गुन्हे, मु धमक्यांची प्रकरणे, हत्या, हवाला रैकेट, ड्रग्ज, बॉलीवुड टॉलीवूडमधील बेकायदा गुंतवणूक यासारख्या अनेक इब्राहीम भारत सरकारला हवा असला, तरी गेल्या काही वर्षांत अशा प्रकरणांत थेट भाग न घेता हस्तकांमार्फत तो ही कामे करून घेत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उघड केले आहे.
डी कंपनीच्या या अंडरवर्ल्ड जाळ्याची, त्यातील बेकायदा कामांचीही विभागणी झाली आहे. दाऊदने जमा केलेली ही अफाट संपत्ती गेल्या काही वर्षांत
कंटेनर कंपन्या, शिपिंग कंपन्या, आयात-निर्यात, खाण, विमान उद्योग, ऊर्जा, मिनरल कंपन्या, पब्लिकेशन हाऊस, रियल इस्टेट, कंत्राटी शेती, हिरे व्यापार, सोन्याचा पुरवठादार आदी क्षेत्रात गुंतवण्यात आली आहे. यातील अनेक धंदे कायदेशीर असतील आणि त्यातून मिळणारा पैसाही बेकायदा नसेल, याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानातील गुंतवणूकदार
भारतविरोधी कारवायांसाठी सातत्याने पाकिस्तानच्या लष्करातील आयएसआयमधील अनेकांना साह्य केलेला दाऊद कराचीत संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहात असला, तरी मोस्ट वॉण्टेड आरोपी म्हणून लपूनछपून नव्हे, तर उजळ माथ्याने.
बड़ा गुंतवणूकदार म्हणून त्याची तेथे बडदास्त ठेवली जाते. आयएसआयचा तो अॅसेट आहे. त्यांना अनेक कारवायांत मार्गदर्शन करणे, त्यासाठी मदत पुरवणे यासह त्यांच्या अधिकाऱ्यांचा बेकायदा पैसा गुंतवणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल सल्ले देण्यापर्यंत अनेक बाबतीत दाऊदचा शब्द अंतिम असतो.
ड्रग्जचा धंदा सोडल्याची अफवा
दाऊदने हज यात्रा केल्यानंतर ड्रग्जच्या धंद्यातून अंग काढून घेतल्याचे जाणीवपूर्वक पसरवण्यात आले होते, मात्र अमेरिका आणि भारतात आजही दाऊदच्या हस्तकांमार्फत मोठ्या प्रमाणात इग्जचा काळाबाजार होतो, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.
दाऊदला सध्या धो धो पैसा मिळवून देणारा धंदा म्हणजे आफ्रिकेतील कॉन्फ्लिक्ट डायमंड किंवा ब्लड डायमंडचा धंदा. आंतरराष्ट्रीय बाजारात या हिन्याची बोलीच कोटीच्या घरात असते.
दाऊदचा हा धंदा, त्याची यातील गुंतवणूक अनीस इब्राहीम, त्याचा मुलगा आरिस इब्राहीम सांभाळतात. तेथील अनेक टोळ्या खाणीतून मिळणाचा या हियांवर डल्ला मारतात, ते पळवतात किंवा कधी स्वतःच पळवून आणलेल्या गुलामांच्या मदतीने हिरे शोधतात.
त्यात होणारा रक्तपात केजीएफ चित्रपटाप्रमाणे असल्याने या हिन्यांना ब्लड डायमंड म्हटले जाते. अंगोला, सिएरा लिओन, काँगोसारख्या देशांतून स्वस्तात हिरे खरेदी करून ते दाऊद टोळी आंतरराष्ट्रीय पातळीवर काळ्या बाजारात अब्जावधींना विकते. पोलंड आणि अन्य युरोपीय देशांत हा व्यवहार चालतो.
औषध तस्करीतून पैसा डी कंपनीने औषधांच्या बेकायदा व्यापारात हात घातला असून, खाडी देशांत व्हायग्राचा बेकायदा पुरवठा सुरु केला आहे. शिवाय भारतात कॅन्सरसह इतर महागड्या औषधांच्या बेकायदा पुरवठ्यातूनही ते पैसा कमवत आहेत, असे गुप्तचर सांगतात.
कोणाकडे कोणता धंदा?
१ | दाऊदचा मुलगा मोईन दाऊदसोबत कराचीतच राहतो. पण डी कंपनीच्या अफाट संपत्तीचा तोच एकुलता वारस आहे.
२ दाऊदचा मुलगा मोईन, त्याचा मरण पावलेला भाऊ तुराचा मुलगा सर्फराज हे ऊर्जा, मिनरल आणि सोन्याचा धंदा सांभाळतात.
३ छोटा शकीलचा मुलगा, भारतात राहात असलेल्या दाऊदच्या बहिणीचा मुलगा दुबईत रिअल इस्टेटमधील कोट्यवधींची गुंतवणूक सांभाळतात.
४ नुराचा दुसरा मुलगा सोहेल काही वर्षापूर्वी
स्पेनमध्ये शस्त्रास्त्रांचा बेकायदा व्यापार करताना पकडला गेला आणि सात वर्षे सुटल्यावर तो दुबईत आला. सध्या तो छोट्या शस्त्रास्त्रांचा बेकायदा धंदा करतो.
द ठाण्याच्या तुरुगात असलेल्या इकबाल कासकरचा मुलगा अब्यान हा डी कंपनीचा आयात- निर्यातीचा धंदा सांभाळतो. हा धंदा पूर्ण कायदेशीर राहील, याची काळजी दाऊदने घेतली आहे.
६ दाऊदचा मरण पावलेला दुसरा भाऊ मुस्तकीन याच्या मुलीने लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले असून, ती सध्या दुबईत एक लॉ फर्म चालवते.
हियांचा व्यापार ही सोन्याची कोंबडी