दाऊद पाकिस्तानातच युनोकडून शिक्कामोर्तब
By Admin | Published: August 23, 2016 04:02 PM2016-08-23T16:02:02+5:302016-08-23T18:03:52+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे मंगळवारी संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले. त्यामुळे भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्र, दि. 23 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे मंगळवारी संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले. त्यामुळे भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारताने संयुक्त राष्ट्राला दाऊदच्या गुन्ह्यांसंबंधी पाठवलेल्या डोसियरमध्ये त्याच्या 9 निवासस्थानांचे पत्ते दिले होते.
त्यातील तीन निवासस्थानांचे पत्ते चुकीचे असल्याने संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध समितीने ते तीन पत्ते आपल्या यादीतून काढून टाकले. अन्य सहा पत्ते योग्य असून दाऊद पाकिस्तानात असल्याचे स्पष्ट केले. दाऊदला आश्रय देण्यासाठी पाकिस्तानवर कारवाई करावी अशी मागणी करताना भारताने संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध समितीला डोसियर सोपवले होते.
दाऊदचा कराचीमधील पत्ता चुकीचा निघाला आहे. दाऊद पाकिस्तानात सातत्याने आपले पत्ते बदलत असतो. तिथे त्याची मोठया प्रमाणावर संपत्ती असून, पाकिस्तानने त्याला संरक्षण दिले आहे. दाऊद मुंबई 1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या साखळी स्फोटात 257 नागरीक ठार झाले होते.