मुंबई पोलिसांमुळे फसला दाऊदचा 'गेम'

By admin | Published: August 24, 2015 04:06 PM2015-08-24T16:06:04+5:302015-08-24T16:14:28+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा छोटा राजन टोळीतील काही गुंडांकडून 'गेम' करण्याचा डाव ठरला होता, मात्र आयत्या वेळी मुंबई पोलिसांमुळे हा डाव फसला असा गौप्यस्फोट भाजपा नेते आर के सिंह यांनी केला आहे.

Dawood's game 'failed' by Mumbai Police | मुंबई पोलिसांमुळे फसला दाऊदचा 'गेम'

मुंबई पोलिसांमुळे फसला दाऊदचा 'गेम'

Next
>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २४ - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा छोटा राजन टोळीतील काही गुंडांकडून 'गेम' करण्याचा डाव ठरला होता, मात्र आयत्या वेळी मुंबई पोलिसांनी त्या गुंडांविरोधात अटक वॉरंट काढल्याने डाव फसला असा गौप्यस्फोट भाजपा खासदार व माजी गृहसचिव आर के सिंह यांनी केला आहे. 
भाजपा खासदार आर के सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दाऊदला भारतात परत आणण्यासंदर्भात त्यांची रोखठोख मतं मांडली. सिंह म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दाऊदला पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. छोटा राजनच्या टोळीतील काही गुंडांना भारतीय यंत्रणांमार्फत ट्रेनिंग दिले जात होते.  या गुंडांमार्फत दाऊदचा गेम केला जाणार होता. मात्र मुंबई पोलिस दलातील काही भ्रष्ट अधिका-यांमुळे याची माहिती दाऊदला समजली. यानंतर मुंबई पोलिस दलाच्या एका पथकाने संबंधीत गुंडांविरोथात थेट अटक वॉरंटच काढले व हा डाव फसला असा दावा सिंह यांनी केला.
दाऊद व हाफिज सईदसारख्यांना संपवण्यासाठी मोदी सरकारने मोहीम हाती घ्यावी असे परखड मत त्यांनी मांडले. भारताला अमेरिका व इस्त्रायलसारखी भूमिका घेऊन शत्रूराष्ट्रात मोहीम राबवायलाच हवी असे त्यांनी नमूद केले. 

Web Title: Dawood's game 'failed' by Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.