अरे देवा! सरकारी नोकरी असलेल्या नवरदेवाशी लग्न केलं पण दुसऱ्याच दिवशी झाला बेरोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:36 PM2023-03-13T17:36:22+5:302023-03-13T17:37:11+5:30
मुलीच्या कुटुंबीयांचा आनंद फार काळ टिकला नाही कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सरकारी कर्मचाऱ्याची नोकरी गेली.
आपल्या मुलीचे लग्न उत्तम घरात व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मुलाला सरकारी नोकरी मिळाली तर बरं होईल. पश्चिम बंगालच्या कूच विहारमधील एका कुटुंबाची अशीच इच्छा होती. त्यांनी आपल्या मुलीचे लग्न एका सरकारी शिक्षकासोबत निश्चित केले. कुटुंबातील मुलीचा विवाह सरकारी कर्मचाऱ्याशी होणार आहे. साहजिकच या घटनेने मुलीच्या घरातील सर्वजण खूप आनंदी झाले. त्यामुळेच लग्नाच्या तयारीत कोणतीही कमतरता नव्हती.
मुलीच्या कुटुंबीयांचा आनंद फार काळ टिकला नाही कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सरकारी कर्मचाऱ्याची नोकरी गेली. प्रणव रॉय असे लग्न झालेल्या मुलाचे नाव आहे. तो 2017 पासून जलपाईगुडी येथील राजदंगा केंडा मोहम्मद हायस्कूलमध्ये कार्यरत होता. हे पाहून मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचे लग्न निश्चित केले होते. दोन्ही कुटुंबे खूप आनंदात होती.
दोघांचेही थाटामाटात लग्न झाले. मात्र त्याच दिवशी न्यायालयाने मोठा निर्णय देत 842 शिक्षकांच्या नियुक्त्या बेकायदेशीर ठरवत त्या रद्द करण्याचे आदेश दिले. ही यादी सार्वजनिक झाली तेव्हा त्यात प्रणव रॉय यांचेही नाव होते. नोकरी गेल्याचे वृत्त समजताच घरात शोककळा पसरली.
थोड्याच वेळात प्रणवच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले. लोक विविध कमेंट करू लागले. कुणी लिहिले, गुरुवारी लग्न झाले, शुक्रवारी नोकरी लागली, शनिवारी लग्न तुटलं. काहींनी ही घटना इतिहासाच्या पानात लिहिली जाईल असंही म्हटलं. या संपूर्ण घटनेवर वधू किंवा वर कोणीही भाष्य करण्यास तयार नव्हते. नवविवाहित जोडप्याच्या कुटुंबातील कोणीही यावर भाष्य केले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"