या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान सन्मान योजनेचे पैसे

By बाळकृष्ण परब | Published: December 19, 2020 01:13 PM2020-12-19T13:13:34+5:302020-12-19T13:16:29+5:30

PM Kisan Sanman Nidhi Yojana : पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

On this day, the money of PM Kisan Sanman Yojana will be deposited in the farmers' account | या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान सन्मान योजनेचे पैसे

या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान सन्मान योजनेचे पैसे

Next

नवी दिल्ली - पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. शुक्रवारी मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. म्हणजेच ही रक्कम २५ डिसेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे.

मोदी सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या रूपात जमा केली जाते. त्याचप्रमाणे  Rft Signed by State Government  असे लिहून आले असेल तर त्याचा अर्थ Request For Transfer म्हणजेच माहिती तपासण्यात आली आहे. तसेच ती पुढील प्रक्रियेसाठी ट्रान्सफर केली जाईल. याचा अर्थ काही काळाने तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल.

FTO चा पूर्ण अर्थ Fund Transfer Order असा आहे. याचा अर्थ असा आहे की, राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक, बँक खात्यांची संख्या आणि बँकांचे आयएफएससी कोडसह अन्य विवरण प्रमाणित करण्यात आले आहे. तुमच्या हप्त्याची रक्कम तयार आहे आणि सरकारकडून तुमच्या बँक खात्यांमध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहे.

Web Title: On this day, the money of PM Kisan Sanman Yojana will be deposited in the farmers' account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.