चंद्रावर दिवस पण विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह नाही, चंद्रयान-३ मोहीम संपली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 03:16 PM2023-09-25T15:16:07+5:302023-09-25T15:16:56+5:30

२० सप्टेंबर २०२३ रोजी चंद्रावर दिवस उजाडला. तेव्हापासून इस्त्रो रोव्हरना अ‍ॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Day on Moon but Vikram lander not active, Chandrayaan-3 mission over | चंद्रावर दिवस पण विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह नाही, चंद्रयान-३ मोहीम संपली का?

चंद्रावर दिवस पण विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह नाही, चंद्रयान-३ मोहीम संपली का?

googlenewsNext

भारताचे चंद्रयान ३ यशस्वी झाले. प्रज्ञान रोव्हरने अनेक महत्वाची माहिती पाठवली, यानंतर चंद्रावर रात्र झाली. त्यामुळे प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर स्लिम मोडवर गेले. आता पुन्हा एकदा चंद्रावर दिवस उजाडला आहे. २० सप्टेंबर २०२३ रोजी सूर्य त्यांच्या लँडिंग पॉईंटवर म्हणजेच शिवशक्ती बिंदूवर उगवला होता.पण त्या प्रकाशाने विक्रम आणि प्रज्ञान अजुनही अॅक्टिव्ह झालेला नाही. 

चंद्रयान ३ चे विक्रम आणि पज्ञान रोव्हर अ‍ॅक्टिव्ह झाले नाही तर काय होईल?

इस्रो टीम २२ सप्टेंबर २०२३ पासून विक्रम लँडरला सतत संदेश पाठवत आहे. पुढील काही दिवस आणखी संदेश पाठवत राहणार आहेत. चंद्रयान-3 मोहीम यशस्वीरित्या संपली आहे. भारताने जगाला जे दाखवायचे होते ते दाखवून दिले.

इस्रोने विक्रमला यशस्वीपणे लँडिंग केले. प्रज्ञान रोव्हर १०५ मीटर चालवण्यात आला. विक्रम लँडरनेही उडी मारून दाखवले. अनेक आवश्यक वायू आणि ऑक्सिजन सारख्या खनिजांच्या उपस्थितीची पुष्टी झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारी ही जगातील पहिली मोहीम होती. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला.

याआधी फक्त अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनकडे सॉफ्ट लँडिंगचे प्रभुत्व होते. आता चंद्रावर जेव्हा रात्र झाली तेव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी विक्रम आणि प्रज्ञान यांना स्लिपमोडवर ठेवले. स्लिमोडवर जाण्यापूर्वी दोन्ही बॅटरी पूर्ण चार्ज झाल्या होत्या. प्रज्ञानचे सोलर पॅनल सूर्याकडे तोंड करून होते. जेणेकरून उगवताच सूर्यप्रकाश थेट त्यावर पडेल. प्रकाश मिळाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय होतील, अशी आशा होती.

विक्रम आणि प्रज्ञान हे दोघे फक्त १४-१५ दिवसांच्या मिशनसाठी बनवले होते. ते आता पूर्ण झाले आहे. त्यापेक्षा जास्त वेळ त्याने तिथे घालवला आहे. ते पुन्हा सक्रीय झाले तर तो वैज्ञानिक चमत्कारापेक्षा कमी नसेल. पण आता ते सक्रीय होणे अवघड वाटते. कारण उणे १२० ते उणे २४० अंश सेल्सिअस तापमानात त्यामध्ये बसवलेल्या उपकरणांचे सर्किट उडून जाण्याचा धोका होता.

युरोपियन स्पेस एजन्सीने पाठवला संदेश

२२ सप्टेंबर २०२३ च्या पहाटे युरोपियन स्पेस एजन्सीने विक्रमला सतत संदेश पाठवले होते. पण लँडरकडून कमकुवत प्रतिसाद मिळाला. म्हणजे ज्या प्रकारची पॉवरफुल रेडिओ फ्रिक्वेन्सी त्यातून यायला हवी होती ती येत नव्हती. विक्रम 2268 MHz वर रेडिओ उत्सर्जित करत होता. हा एक कमकुवत बँड आहे. 

Web Title: Day on Moon but Vikram lander not active, Chandrayaan-3 mission over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.