मोठी बातमी! कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या TOCIRA औषधाच्या आपत्कालीन वापराला DCGI ची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 03:59 PM2021-09-06T15:59:02+5:302021-09-06T16:00:07+5:30

TOCIRA Approval: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

DCGI approves Hetero Tocilizumab for treatment of COVID 19 in hospitalised adults | मोठी बातमी! कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या TOCIRA औषधाच्या आपत्कालीन वापराला DCGI ची मंजुरी

मोठी बातमी! कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या TOCIRA औषधाच्या आपत्कालीन वापराला DCGI ची मंजुरी

googlenewsNext

TOCIRA Approval: देशात कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आलेला असल्यामुळे केंद्र सरकारकडून यासाठीची उपाययोजना केली जात आहे. त्यामुळेच कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यावरही सरकारनं भर दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी भारतात टोसिजिजुमॅबच्या औषधाला वापरासाठी डीसीजीआयकडून मंजुरी देण्यात आल्याचं हेटेरो कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे.  (DCGI approves Hetero Tocilizumab for treatment of COVID 19 in hospitalised adults)

सिस्टमॅटीक कॉर्टिकोस्टेरॉइड, आवश्यक सप्लीमेंटल ऑक्सिजन, वेंटिलेटर आणि एक्स्ट्राकॉर्पोरेल ऑक्सीजनसेशनवर असलेल्या रुग्णांवर हे औषध वापरलं जाणार असल्याचं कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कंपनीनं देशात मेंटोसीलिजुमॅब (टोसीरा) औषधाला मिळालेली मंजुरी आपल्यातील तांत्रित क्षमता आणि कोविड विरुद्धच्या लढ्यासाठीची कटिबद्धता दाखवून देणारी आहे. औषधाच्या समान वितरण पद्धत सुनिश्चित करण्यासाठी सरकारसोबत एकत्रितरित्या काम करू, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

TOCIRA (Tocilizumab) औषधाचं भारतातलं मार्केटींग Hetero Healthcare कंपनी करणार आहे. या कंपनीच्या मजबूत नेटवर्कमुळे संपूर्ण देशभरात सहजरित्या औषध उपलब्ध करुन दिलं जाईल. हेटेरो कंपनीच्या हैदराबादमधील हेटेरो बायोफार्मा युनिटमध्ये या औषधाची निर्मिती केली जाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात हे औषध उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं आहे. 

देशात २४ तासांत ३८,९४८ नवे रुग्ण
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३८,९४८ नवे रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३,३०,२७,६२१ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत २१९ जणांचा मृत्यू जाला आहे. यानुसार देशातील एकूण मृत्यूंचा आकडा आता ४,४०,७५२ वर पोहोचला आहे. देशात सध्या ४.०४ लाख सक्रीय रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 

Web Title: DCGI approves Hetero Tocilizumab for treatment of COVID 19 in hospitalised adults

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.