BREAKING: कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डला बाजारात विक्रीची परवानगी, DCGI ची सशर्त मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:51 PM2022-01-27T15:51:41+5:302022-01-27T15:53:05+5:30
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) भारतातील दोन महत्त्वाच्या Covishield आणि Covaxin या कोरोना विरोधी लसींच्या बाजारातील विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली-
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) भारतातील दोन महत्त्वाच्या Covishield आणि Covaxin या कोरोना विरोधी लसींच्या बाजारातील विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. असं असलं तरी लस थेट मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार नाही. हॉस्पीटल्स आणि क्लिनिकमध्ये लस खरेदी करता येऊ शकणार आहे. तसेचं तिथेच ती दिली देखील जाईल. खरेदी करण्यात येणाऱ्या लसींचा संपूर्ण डेटा संबंधित खरेदीदारांना डीसीजीआयकडे दर सहा महिन्यांनी सुपूर्द करावा लागणार आहे. संपूर्ण डेटा कोविन अॅपवर देखील अपडेट होणार आहे. दरम्यान, लसींची विक्री किंमत नेमकी किती असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
#COVID19 | The vaccines will not be available in medical stores. The hospitals and clinics can purchase the vaccines. Vaccination data has to be submitted to DCGI every six months. Data to be updated on CoWIN app also.
— ANI (@ANI) January 27, 2022
दोन्ही लसी केवळ देशात आपत्कालीन वापरासाठी अधिकृत आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या COVID-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने, 19 जानेवारी रोजी, Covishield आणि Covaxin ची काही अटींसह प्रौढांसाठी नियमितपणे विक्री करण्यास मान्यता देण्याची शिफारस केली होती. आपत्कालीन वापरात सेफ्टी डेटा DCGI ला १५ दिवसांच्या आत द्यावा लागतो. सशर्त मंजुरी दिल्याने ६ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीत डेटा DCGI कडे सादर करावा लागेल. तसेच ही माहिती को-विनवर देखील द्यावी लागेल. याआधी अमेरिकेतील फायझर आणि यूकेमधील अॅस्ट्राझेनेका या लसींना बाजार विक्रीसाठी सशर्त मंजुरी देण्यात आली आहे.
The @CDSCO_INDIA_INF has now upgraded the permission for COVAXIN and Covishield from restricted use in emergency situations to normal new drug permission in the adult population with certain conditions.
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) January 27, 2022