आता १२ नाही, तर ६ वर्षांच्या वरील मुलांनाही मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस; सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:02 PM2022-04-26T14:02:50+5:302022-04-26T14:24:09+5:30
कोरोनाच्या नव्या लाटेच्या शक्यतेदरम्यान केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय. आता ६ ते १२ वर्षांच्या मुलांनाही कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या (Coronavirus) नव्या लाटेच्या शक्यतेदरम्यान केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता ६ ते १२ वर्षांच्या मुलांनाही कोरोना प्रतिबंधात्मक (Coronavirus Vaccine) लस देण्यात येणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं ६ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याला मंजुरी दिली आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
देशात ६ वर्षांवरील मुलांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (Covaxin), बायोलॉजिकल ई च्या कॉर्बेव्हॅक्स आणि १२ वर्षांवरील मुलांना ZycovD (जाइडस कॅडिला) या लसींच्या प्रतिबंधित आपात्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. सध्या १२ ते १४ या वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स ही लस देण्यात येत आहे. १५ ते १८ या वयोगटातील मुलांचं लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्यात आलं. त्यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत आहे. ६ ते १२ वयोगटातील मुलांचे लसीकरण करताना पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी आणि नंतर पाच महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला विश्लेषणासह डेटा पुरवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
#COVID19 | DCGI (Drugs Controller General of India) grants emergency use authorisation to Corbevax for children between the age of 5-12 years: Sources
— ANI (@ANI) April 26, 2022
#COVID19 | DCGI grants emergency use authorisation to ZycovD (Zydus Cadila vaccine) for children above the age of 12 years: Sources— ANI (@ANI) April 26, 2022
१६ मार्च रोजी या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यात आली आणि त्यानंतर १२ ते १४ वर्षांवरील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यांना कॉर्बेव्हॅक्स ही लस देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी लहान मुलांमध्येही कोरोनाच्या एसई व्हेरिअंटची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तसंच गेल्या काही आठवड्यांमध्ये मुलांमध्ये फ्लू सारखी लक्षणंही वाढल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. एक्सई हा व्हेरिअंट कोरोनाच्या अन्य व्हेरिअंट्सच्या तुलनेत अधिक वेगानं पसरत असल्याचं म्हटलं जातं. अशातच लहान मुलांचंही या व्हेरिअंटपासून संरक्षण होणं आवश्यक आहे.