Corona Vaccine: मोठी बातमी! १२ ते १८ वयोगटासाठीच्या Corbevax लसीला DCGI कडून मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 07:29 PM2022-02-21T19:29:36+5:302022-02-21T19:30:01+5:30
देशात कोरोनाचा हाहाकार आता कमी झाला असला तरी कोरोना विरोधातील लसीकरण मोहीम अजूनही जारी आहे. देशात मोठ्या प्रमाणत लसीकरण करुन नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित केलं जात आहे.
देशात कोरोनाचा हाहाकार आता कमी झाला असला तरी कोरोना विरोधातील लसीकरण मोहीम अजूनही जारी आहे. देशात मोठ्या प्रमाणत लसीकरण करुन नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित केलं जात आहे. आता कोरोना लसीकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता देशात १२ ते १८ वयोगटातील मुलामुलींनाही कोरोना विरोधी लस देण्यास सुरुवात होणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) भारताच्या 'बायोलॉजिकल ई'द्वारे निर्माण केल्या गेलेल्या कोर्बेव्हॅक्स (Corbevax) लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
'बायोलॉजिकल ई' कंपनीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना विरोधात भारताच्या पहिल्या स्वदेशी पातळीवर विकसीत करण्यात आलेल्या रिसेप्टर बाइन्डिंग डोमेन प्रोटीन सब-युनिट व्हॅक्सीन, बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या कोर्बेव्हॅक्स लसीला १२ ते १८ वयोगटातील नागरिकांवर आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.
गेल्याच आठवड्यात देशाच्या केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या विशेष समितीनं १२ ते १८ वयोगटातील मुलामुलींवर काही अटी-शर्तीसंह बायोलॉजिकल-ई कंपनीद्वारे विकसीत कोर्बोव्हॅक्स लसीला मान्यता द्यावी यासाठीची शिफारस केली होती.