डीडीसीएने बनावट कंपन्यांना पैसे दिले - किर्ती आझाद
By admin | Published: December 20, 2015 05:14 PM2015-12-20T17:14:20+5:302015-12-20T17:21:56+5:30
दिल्ली क्रिकेट संघटनेने बनावट कंपन्यांना कामाची कंत्राटे दिली. डीडीसीएने बनावट पत्ते असलेल्या कंपन्यांना कामाची कंत्राटे दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - दिल्ली क्रिकेट संघटनेने बनावट कंपन्यांना कामाची कंत्राटे दिली. डीडीसीएने बनावट पत्ते असलेल्या कंपन्यांना कामाची कंत्राटे दिली. डीडीसीएने अनेक कंपन्यांना पैसे दिले पण त्यांच्या कामाचे स्वरुप स्पष्ट केले नाही. डीडीसीएचे सदस्य निविदांच्या किंमतीमध्येही फेरफार करायचे असे आरोप भाजप खासदार किर्ती आझाद यांनी रविवारी केला.
डीडीसीएतील घोटाळयांसंदर्भात त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन अनेक आरोप केले. कुठलीही छाननी केल्याशिवाय कोटयावधी रुपयांची कंत्राटे दिली गेली. बिले मंजूर करताना कुठलीही बैठक झाली नाही. किर्ती आझाद यांनी डीडीसीएतील भ्रष्टाचार उघड करणारा एक व्हिडीओ दाखवला.
पत्रकारपरिषदेच्या प्रारंभी आझाद यांनी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा चाहता असल्याचे सांगितले. आमची ही लढाई कुणा एका व्यक्तिविरोधात नसून, भ्रष्टाचारा विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेतील किर्ती आझाद यांचे आरोप
आमची लढाई व्यक्तिगत नसून, भ्रष्टाचाराविरुध्द आहे.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा फॅन आहे.
डीडीसीएशी संदर्भात १४ बनावट कंपन्या समोर आल्या आहेत, कंपन्यांना कोटयावधी रुपये देण्यात आले पण त्यांचे काम सांगितलेले नाही.
डीडीसीएने बनावट पत्ते असलेल्या कंपन्यांना कंत्राटे दिली, लोक तेच पण कंपनीचे नाव बदलले जायचे.
डीडीसीए घोटाळयामध्ये कंपन्यांना चौकशी केल्याशिवाय पैसे देण्यात आले, डीडीसीएचे सदस्य निविदांच्या किंमतीमध्ये फेरफार करायचे.