दिल्लीत पुन्हा 'मास्क' अनिवार्य; न घातल्यास 500 रुपये दंड! DDMA च्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 01:57 PM2022-04-20T13:57:13+5:302022-04-20T13:57:47+5:30

DDMA Meeting: आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची (DDMA) आज एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ddma meeting today mask mandatory schools not closed sop issued  | दिल्लीत पुन्हा 'मास्क' अनिवार्य; न घातल्यास 500 रुपये दंड! DDMA च्या बैठकीत निर्णय

दिल्लीत पुन्हा 'मास्क' अनिवार्य; न घातल्यास 500 रुपये दंड! DDMA च्या बैठकीत निर्णय

Next

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची (DDMA) आज एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्लीचे नायब राज्यपाल (LG) अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन आणि इतर अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले आहेत, ते पुढील प्रमाणे जाणून घ्या...

डीडीएमएच्या बैठकीतील निर्णय...
आज झालेल्या डीडीएमएच्या बैठकीत कोरोनाची परिस्थिती पाहता मास्क पुन्हा अनिवार्य करण्यात आला आहे.
आता पुन्हा एकदा मास्क न लावणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जाणार आहे.
लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे.
डीडीएमएच्या बैठकीत शाळा बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचबरोबर, सरकार सामाजिक कार्यक्रमांवर बारीक लक्ष ठेवणार आहे.

गेल्या 24 तासांत 600 हून अधिक रुग्ण
दिल्लीत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये गेल्या 24 तासांत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी राजधानीत कोरोनाची 632 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. याआधी सोमवारी दिल्लीत कोरोनाचे 501 नवीन रुग्ण आढळले होते. मात्र, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकारात्मकतेचे प्रमाण घटले. सोमवारी सकारात्मकता दर 7 टक्के होता, तर मंगळवारी तो 4.42 टक्के होता.
 

Web Title: ddma meeting today mask mandatory schools not closed sop issued 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.