बेपत्ता भारतीयांचे मृतदेह आढळले
By Admin | Published: September 12, 2015 02:56 AM2015-09-12T02:56:18+5:302015-09-12T02:56:18+5:30
सौदीने येमेनमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर बेपत्ता झालेल्या सात भारतीयांपैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एक जण अद्यापही बेपत्ता आहे.
नवी दिल्ली : सौदीने येमेनमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर बेपत्ता झालेल्या सात भारतीयांपैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एक जण अद्यापही बेपत्ता आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. २१ भारतीय प्रवास करत असलेल्या मुस्तफा व अस्मार या दोन नावांवर ८ सप्टेंबर रोजी हवाई हल्ला होऊन सात भारतीय बेपत्ता झाले होते त्यापैकी सहा जणांचे मृतदेह १० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हाती लागले असून ते लष्करी रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना कल्पना दिली असून मृतदेहांवर होदीयदाह येथे धार्मीक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातील. अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या कुटुंबियांची संमती घेण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. या दोन नावांवरील उर्वरित १४ जण सुरक्षित असून त्यातील चौघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.