भज्यांच्या पाकिटात आढळली मेलेली पाल, तरुणाची FSSAI कडे तक्रार; चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 05:49 PM2021-10-28T17:49:23+5:302021-10-28T18:32:05+5:30

ही घटना तामिळनाडूतील तिरुनेलवेलीच्या पलायमकोट्टई शहरात घडली आहे.

dead lizard ound in pakodas in palayamkottai city of tamilnadu | भज्यांच्या पाकिटात आढळली मेलेली पाल, तरुणाची FSSAI कडे तक्रार; चौकशी सुरू

भज्यांच्या पाकिटात आढळली मेलेली पाल, तरुणाची FSSAI कडे तक्रार; चौकशी सुरू

Next

तिरुनेलवेली: तुम्ही अनेकदा जेवणाच्या ताटात किंवा भाज्यांमध्ये पाल आढळल्याच्या घटना वाचल्या असलील. अशाच प्रकारची एक घटना तामिळनाडूत घडली आहे. भज्यांच्या पॅकेटमध्ये मृत पाल आढळली आहे. या पालिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथील पलायमकोट्टई शहरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने एका दुकानातून भजी पार्स घेतली. त्याने घरी जाऊन पॅकेट उघडले असता, त्याला त्यात मेलेली पाल आढळली. 23 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेचे फोटो त्याच व्यक्तीने सोशल मीडियावर टाकले आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया(FSSAI) कडे तक्रार दाखल केली. यानंतर एफएसएसआयने तिरुनेलवेली अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली भेट

तक्रारीनंतर अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने दुकानाला भेट दिली आणि दुकानाची कसून तपासणी केली, त्यानंतर बंद डब्यात मिठाई आणि शेवया व्यवस्थित न ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांना काही खराब झालेली मिठाई देखील नष्ट करावी लागली. माध्यमाशी संवाद साधताना, FSSAI अधिकारी शशी दीपा म्हणाले, आम्हाला व्हॉट्सअॅपवर तक्रार प्राप्त झाली आणि त्यानंतर जिल्हा कार्यालयाकडून सूचना आल्या. ही घटना 23 ऑक्टोबरची आहे पण आम्हाला 25 ऑक्टोबरला संध्याकाळी तक्रार मिळाली. तक्रारदाराला पाकीट उघडले असता त्यात मृत पाल आढळून आल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. या तक्रारीच्या आधारे आम्ही तपास करत आहोत.

Web Title: dead lizard ound in pakodas in palayamkottai city of tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.