Breaking News: मोठी बातमी! IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ; पण खूप दिवस नाही, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 06:52 PM2020-12-30T18:52:46+5:302020-12-30T19:11:30+5:30
IT return filing Deadline : आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती.
नवी दिल्ली : आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती. यावर केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.
सामान्य लोकांना, नोकरदारांना आयकर भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच ही मुदतवाढ केवळ 12 दिवसांसाठी देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाने याची घोषणा केली.
Due date for furnishing of Income Tax Returns for the assessment year 2020-21 for taxpayers (including their partners) who are required to get their accounts audited has been extended to February 15: Finance Ministry https://t.co/NbQ8MeWrd4
— ANI (@ANI) December 30, 2020
तर ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना व त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्य़ात आली आहे.
याचबरोबर जीएसटी भरण्यासही 28 फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे.
Due date of furnishing of annual return under Central Goods and Services Tax Act, 2017 for the financial year 2019-20 extended to February 28: Central Board of Indirect Taxes & Customs pic.twitter.com/BcruUSiuCt
— ANI (@ANI) December 30, 2020
2019-20 (असेसमेंट वर्ष 2020-21) मध्ये जवळपास 43.7 दशलक्ष आयटी रिटर्न 28 डिसेंबरपर्यंच दाखल झाल्याचे आयकर विभागाने मंगळवारी सांगितले होते.
काहीसा दिलासा...
कोरोना कहरामुळे केंद्र सरकारने विवरणपत्रे सादर करण्याची मुदत ३१ जुलैऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवून दिली होती. वेळेत विवरणपत्रे दाखल न केल्यास अधिक उत्पन्न असलेल्यांना दंड भरावा लागणार होता. मात्र, आमच्या आर्थिक व्यवहारांची दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने व नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे विवरणपत्रे सादर करण्यासाठी सरकारने २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ४० टक्के व्यापारी व मध्यम उद्योजकांनी केली होती. मात्र, केंद्राने केवळ 10 दिवसच वाढ दिल्याने तसेच ज्यांचे ऑडिट करायचे आहे त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे. देशातील सुमारे ४१ टक्के छोट्या व मध्यम व्यापारी, तसेच उद्योजकांनी अद्याप विवरणपत्रे सादर केलेली नाहीत.
प्राप्तिकर परताव्याचा दावा कसा करावा?