शिवसेनेच्या नेत्यावर पंजाबमध्ये जिवघेणा हल्ला! शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 03:08 PM2024-07-05T15:08:47+5:302024-07-05T15:09:05+5:30

रक्तबंबाळ अवस्थेत थापर यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतू त्यांची परिस्थिती पाहून त्यांना वरच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. थापर यांची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Deadly attack on Shiv Sena leader in Punjab! Relatives of Shaheed Sukhdev Singh Sandip Thapar gora seriously injured | शिवसेनेच्या नेत्यावर पंजाबमध्ये जिवघेणा हल्ला! शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी

शिवसेनेच्या नेत्यावर पंजाबमध्ये जिवघेणा हल्ला! शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी

पंजाबच्या लुधियानामध्ये शिवसेनेचे नेते आणि शहीद सुखदेव सिंग यांचे नातेवाईक संदीप थापर गोरा यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये संदीप थापर गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

निहंगांच्या वेशात आलेल्या ३ ते चार हल्लेखोरांनी संदीप थापर यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले. सिव्हिल हॉस्पिलच्या बाहेरच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. 

संवेदना ट्रस्टचे प्रमुख रविंदक अरोरा यांच्या पुण्यातिथी सोहळ्याचे आयोजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. थापर यांच्यासोबत बंदुकधारी गार्डही होते. या सोहळ्यात अरोरा यांना अभिवादन करून बाहेर येत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला.

रक्तबंबाळ अवस्थेत थापर यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतू त्यांची परिस्थिती पाहून त्यांना वरच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. थापर यांची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

Web Title: Deadly attack on Shiv Sena leader in Punjab! Relatives of Shaheed Sukhdev Singh Sandip Thapar gora seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.