'प्रिय भक्तांनो, मी त्यांनाच प्रश्न विचारतोय जे सत्तेत आहेत, सत्तेत मी नाहीये'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 01:05 PM2021-06-03T13:05:12+5:302021-06-03T13:06:30+5:30
प्रकाश राज, स्वरा भास्कर यांसह समाजवादी विचारसरणीच्या नवयुकांनी ट्विटरवरुन हॅशटॅग JustAsking हा ट्रेंड सुरू केलाय. गाझियाबादमधील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी स्वरा भास्करने ट्विट केलं आहे.
मुंबई - आपल्यातील नायक अन् खलनायकाच्या भूमिकेनं दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर राज्य गाजवणाऱ्या आणि सिंघम चित्रपटात जयकांत शिक्रे बनून हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे अभिनेता प्रकाश राज हे आपल्या स्पष्ट भूमिकेबद्दल नेहमीच चर्चेत असतात. सरकारविरोधी भूमिका घेत असल्याने आणि मोदींविरुद्ध आवाज उठवत असल्याने प्रकाश राज यांना नेहमीच ट्रोल करण्यात येतं. त्यावरुनच, आज अगदी प्रेमळ शब्दात प्रकाश राज यांनी ट्रोलर्संना उत्तर दिलंय.
प्रकाश राज, स्वरा भास्कर यांसह समाजवादी विचारसरणीच्या नवयुकांनी ट्विटरवरुन हॅशटॅग JustAsking हा ट्रेंड सुरू केलाय. गाझियाबादमधील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी स्वरा भास्करने ट्विट केलं आहे. तसेच, कठुआ मंदिरातील गँगरेप आणि गाझियाबाद येथील मशिदीतील बलात्कार या दोन्ही समान घटना आहेत. दोन्ही आरोपींना शिझा झाली पाहिजे. पण, काहीजण आरोपीच्या समर्थनार्थ मोचे काढत आहे. यावेळी, भारत माती की जय म्हणणारे त्यांविरुद्ध का बोलत नाहीत, असा सवाल स्वराने विचारला आहे. राज यांनी स्वराचे हे ट्विट रिट्विट केलंय. त्यासोबत, JustAsking हा हॅशटॅगही वापरला आहे.
Dear BHAKT”s ...
— Prakash Raj (@prakashraaj) June 3, 2021
I am questioning who is in POWER
You are asking me to question who is NOT IN POWER
we are not the same #justasking
प्रकाश राज यांना काही नेटीझन्सकडून या ट्विटवर ट्रोल करण्यात आलं. त्यावरही प्रकाश राज यांनी उत्तर दिलंय. प्रिय भक्तांनो, मी त्यांनाच प्रश्न विचारत आहे, जे आज सत्तेत आहेत. मी सत्ते नाही... असे ट्विट राज यांनी केलंय. दरम्यान, प्रकाश राज हे मोदीविरोधी भूमिकेमुळे कायम चर्चेत असतात. आपली मतं ते सोशल मीडियावरही निर्भीडपणे मांडतात. त्यामुळे, त्यांना मानणारा आणि फॉलो करणारा विचारांची बांधिलकी जपणाराही एक वर्ग आहे. राज यांनी मोदींच्या वाढलेल्या दाढीबद्दलही ट्विट करुन टीका केली होती.
राज यांचं जुनं ट्विट
प्रकाश राज यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेत्यांनो, नागरिकांनी स्पष्टपणे म्हटले आहे. द्वेष आणि व्हायरस पसरवणं आता थांबवा. दाढी करा आणि तुम्ही ज्या काही चुका केल्यात त्या निस्तरायला आता सुरुवात करा. अखेर जीव महत्त्वाचा आहे' प्रकाश राज यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत होतं.