महागाई भत्ता १०७ टक्के
By admin | Published: August 1, 2014 04:38 AM2014-08-01T04:38:01+5:302014-08-01T04:38:01+5:30
जुलै २०१४पासून महागाई भत्त्याचा नेमका दर काय राहील, याची जून महिन्यापासून लागलेली उत्सुकता संपुष्टात आली आहे
नवी दिल्ली : जुलै २०१४पासून महागाई भत्त्याचा नेमका दर काय राहील, याची जून महिन्यापासून लागलेली उत्सुकता संपुष्टात आली आहे. एआयसीपीआयएनने निश्चित केलेला महागाई भत्ता श्रम मंत्रालयाने गुरुवारी जारी केला. ७ टक्क्यांच्या वाढीनंतर महागाई भत्त्याचा दर १०७ टक्के होईल.
श्रम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक २ अंकांनी वाढून २४६ वर गेला. या आधारावर जुलै २०१४मध्ये देण्यात येणारा महागाई भत्ता वाढणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर याबाबतचा आदेश वित्त मंत्रालयातर्फे जारी केला जाईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या वाढीव महागाई भत्त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)