दिवाळीआधी वाढणार २ टक्के महागाई भत्ता

By admin | Published: October 27, 2016 04:56 AM2016-10-27T04:56:51+5:302016-10-27T04:56:51+5:30

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए जुलै २०१६ पासून २ टक्क्यांनी वाढविण्याची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. सुमारे ५० लाख कर्मचारी व ५८ लाख

Dearness Allowance, 2 percent dearness allowance before Diwali | दिवाळीआधी वाढणार २ टक्के महागाई भत्ता

दिवाळीआधी वाढणार २ टक्के महागाई भत्ता

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए जुलै २०१६ पासून २ टक्क्यांनी वाढविण्याची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. सुमारे ५० लाख कर्मचारी व ५८ लाख पेन्शनधारकांची यंदाची दिवाळी धूमधडाक्यात होईल.
याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेस येणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला महागाई भत्ता ६ टक्क्यांनी वाढवून, तो मूळ वेतनाच्या १२५ टक्के करण्यात आला होता. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आला.
महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवावा
केंद्रीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष के. के. कुट्टी यांनी सांगितले की, ‘औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक मूल्यांक निर्देशांकाच्या बारा महिन्यांच्या सरासरीनुसार (१ जुलै २०१५ ते ३० जून २०१६) महागाई भत्ता २.९२ टक्के होतो. त्यामुळे कर्मचारी संघटना ३ टक्के महागाई भत्त्यासाठी आग्रही आहेत.

Web Title: Dearness Allowance, 2 percent dearness allowance before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.