सरकारी रुग्णालयात एकाच दिवशी २१ रुग्णांचा मृत्यू
By Admin | Published: July 24, 2016 08:01 AM2016-07-24T08:01:25+5:302016-07-24T08:01:25+5:30
हैदराबादमधील गांधी रुग्णालयात एकाच दिवशी २१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २४ - हैदराबादमधील गांधी रुग्णालयात एकाच दिवशी २१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांधी हॉस्पिटल हे बाराशे खाटांचे सरकारी रुग्णालय आहे. एकाच दिवशी इतक्या रुग्णांच्या मृत्यूसाठी विद्युतपुरवठा कारणीभूत असल्याचे रुग्णालयाच्या कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
विद्युतपुरवठा वारंवार खंडीत झाल्यामुळे उपाचाराअभावी रुग्ण दगावले असे रुग्णालयाचे म्हणणे आहे. शुक्रवारी या रुग्णालयात उपचार घेणा-या २१ रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वप्रथम दुपारी तीन वाजता विद्युत पुरवठा खंडीत झाला त्यानंतर वारंवार काही वेळाच्या अंतराने विद्युत पुरवठा खंडीत होत राहीला असे रुग्णालयाचे म्हणणे आहे.
सर्जिकल इंटेंसिव्ह केअर युनिट, निओ-नाटाल इंटेंसिव्ह केअर युनिट, इर्मजन्सी युनिट अशा विशेष कक्षातील रुग्णांचा मृत्यू झाला. माझा या रुग्णालयात काम करण्याचा जो १४ वर्षांचा अनुभव आहे त्यानुसार दरदिवशी सरासरी १० रुग्णांचा मृत्यू होतो असे डॉ. आर.रघु यांनी सांगितले. हे २१ मृत्यू नेमके कशामुळे झाले विद्युत पुरवठा याला कारण आहे की, अन्य काही याची चौकशी होऊ शकते.