'दंगल' पाहताना ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू
By admin | Published: January 17, 2017 11:16 AM2017-01-17T11:16:44+5:302017-01-17T11:23:01+5:30
दंगल चित्रपट पाहताना हृदयविकाराचा झटका आल्याने ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातमध्ये घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १७ - अभिनेता आमिर खानच्या बहुचर्चित 'दंगल'ने बॉक्स ऑफीसवर तर तूफान यश मिळवलेच पण चाहत्यांनीही चित्रपटाचे खूप कौतुक केले असून अनेक पुरस्कारांवरही चित्रपटाने नाव कोरले. चित्रपटाचे हे यश पाहून आमिर आणि दंगलची टीम खूप खुश असली तरी याच चित्रपटामुळे गुजरातमधील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. थिएटरमध्ये ' दंगल' चित्रपट पाहताना हृदयविकाराचा झटका येऊन एका ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अभय कुमार सिंग असे मृत इसमाचे नाव असून १४ जानेवारी रोजी तो पत्नी व मुलांसह मोटेरा येथील पीव्हीआर सिनेमागहात चित्रपट पाहण्यास गेला होता. मात्र तेथे त्याला अस्वस्थ वाटू लागले. मध्यांतर झाल्यानंतर अभय कुमार सिंग बेशुद्ध पडल्याचे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले. तिने त्याला उठवण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र ते व्यर्थ ठरले. हे पाहताच थिएटर व्यवस्थापनाने तातडीने रुग्णवाहिका बोलावली व अभय कुमार सिंग यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.