नक्षली कारवाई दरम्यान 'अमिनिका' श्वानाचा मृत्यू
By admin | Published: January 18, 2017 06:01 PM2017-01-18T18:01:03+5:302017-01-18T18:24:38+5:30
झारखंडमधील लतेहार जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाईत सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील एका श्वानाचा इम्प्रोव्हाईजड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसच्या (आयईडी) स्फोटात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
लतेहार, दि. 18 - झारखंडमधील लतेहार जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाईत सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील एका श्वानाचा इम्प्रोव्हाईजड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसच्या (आयईडी) स्फोटात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
अमिनिका असे या श्वानाचे नाव असून कोब्रा युनिटची नक्षलविरोधी कारवाई सुरु असताना नक्षलवाद्यांचा मोरक्या अरविंदजी याला पकडण्यात महत्वाची जबाबदारी निभावली. यावेळी नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात श्वानाचा मृत्यू झाला. तर या श्वानाला हॅण्डल करणारा पोलीस अधिकारी सुद्धा या स्फोटात जखमी झाला.
नक्षलविरोधी कारवाई सुरु असताना श्वानाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आज दुपारच्या सुमारास श्वानाचे पार्थिव बटालियनच्या मुख्यालयात आणून त्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, असे सीआरपीएफचे कमांडंट पंकज कुमार यांनी सांगितले.