वादग्रस्त गुरू ओशोंची पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांचे अध्यात्म

By Admin | Published: January 19, 2017 01:50 PM2017-01-19T13:50:07+5:302017-01-19T18:09:06+5:30

अध्यात्मिक गुरू ओशो ऊर्फ रजनीश यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त जीवन, प्रेमसंदर्भातील त्यांचे काही विचार जाणून घ्या.

The death of controversial master Osho, know their spirituality | वादग्रस्त गुरू ओशोंची पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांचे अध्यात्म

वादग्रस्त गुरू ओशोंची पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांचे अध्यात्म

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19  - अध्यात्मिक गुरू ओशो ऊर्फ रजनीश यांची आज पुण्यतिथी आहे. अध्यात्मिक विचारांशिवाय त्यांनी जीवनातील व्यावहारिक अडचणी, प्रेम, नात्यांसंदर्भातही अनेक विचार सांगितेल आहेत. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली. काहींनी त्यांना योग्य मानले तर काहींनी अयोग्य ठरवले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनंतरही त्यांची प्रसिद्धी आजही कायम आहे. 
 
ओशो यांच्या पुण्यतिथी निमित्त 'जीवन' आणि 'प्रेम' संदर्भातील त्यांचे विचार 
1. जर कोणाचे मन जिंकायचे असेल तर, तर भांडण करू नका, हा पहिला नियम आहे  
 
2. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी इथे कोणीही नाही, प्रत्येक जण स्वत:चे नशीब बनवण्यात गुंतले आहेत. 
 
3. तुम्हाला जे काही करण्याची इच्छा ते नक्की करा, लोकं काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण लोकं तेव्हादेखील काही तरी बोलणारच, जेव्हा तुम्ही काहीच करणार नाहीत. 
 
4. कोणताही व्यक्ती भले लाखो गोष्टी जाणत असला, संपूर्ण जगाला ओळखत असला, मात्र जर तो स्वतःला ओळखू शकला नाही तर तो अज्ञानी आहे. 
 
5. सत्य तुमच्यामध्येच आहे, त्याचा इतरत्र शोध घेऊ नका.
 
6. तुम्हाला स्वतःचाच सहवास आवडत नसेल तर इतरही तुमच्या सहवासाचा आनंद घेऊ शकत नाहीत. 
 
7. लोकं काय विचार करत आहेत याची चिंता करू नका, तुम्हाला काय चांगले वाटत आहे, यावर लक्ष द्या. 
 
8. जेव्हा प्रेम आणि द्वेष या दोन्ही भावना नसतील, तेव्हा प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि स्पष्ट होते.  
 
9. जेव्हा भय संपते, तिथूनच जीवन सुरू होते.
 
10. स्वातंत्र्य आपला सर्वात मोठा खजिना आहे, कोणासाठी काही तरी मिळवण्याच्या प्रयत्नात ते गमवू नका.
  
11. कोणासोबतही कोणत्याही प्रकारची स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही. जसे आहात तसे तसे स्वतःचा स्वीकार करा.  
 

Web Title: The death of controversial master Osho, know their spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.