अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकाचा मृत्यू
By admin | Published: July 6, 2017 02:04 PM2017-07-06T14:04:42+5:302017-07-06T14:14:35+5:30
उत्तर प्रदेशातील एका 59 वर्षीय व्यक्तीचा अमरनाथ यात्रेदरम्यान मृत्यू झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 6- उत्तर प्रदेशातील एका 59 वर्षीय व्यक्तीचा अमरनाथ यात्रेदरम्यान मृत्यू झाला आहे. मध्य काश्मीरमधील बाल्टाल बेस कॅम्पवर अमरनाथ यात्रा पोहचली असताना ही घटना घडली आहे. यात्रा सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत यात्रेत सात यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील बिसालपूरमधील मोहल्ला पटेलनगरमध्ये राहणारे बंकी लाल यांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. बुधवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना सौरामधील एसकेआयएमएस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं आहे. उपचारानंतर लाल यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे सहकारी त्यांना पुन्हा बाल्टाल बेस कॅम्पवर घेऊन गेले होते.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहा वाजता लाल यांच्या तब्येतीत पुन्हा बिघाड झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं पण त्यावेळी डॉक्टरांनी लाल यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. याआधीही यात्रेदरम्यान भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आत्ता मृत्यू झालेल्यांचा आकडा सात झाला आहे. याआधी सहा भाविकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. 28 जून रोजी आयटीबीपीचे सहाय्यक उपनिरिक्षकांचाही मृत्यू झाला.
आणखी वाचा
जम्मू काश्मीर : 6 दिवसांत 80,000 यात्रेकरूंनी पूर्ण केली अमरनाथ यात्रा
चाळीस दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेस 29 जूनपासून प्रारंभ झाला असून गेल्या सहा दिवसांत जवळपास 80,000 यात्रेकरूंनी अमरनाथची यात्रा पूर्ण केली आहे. एका अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, 3,389 यात्रेकरूंचा आणखी एक जत्था कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला आहे. निमलष्करी दलासोबत 102 वाहनांतून हे यात्रेकरू पहाटे 4.05 वाजण्याच्या सुमारास भगवती नगर यात्री निवास स्थानाहून अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत.
अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 3,389 यात्रेकरूपैकी 2,253 यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्प येथे जाणार आहेत तर 1,136 यात्रेकरू बालटाल बेस कॅम्प येथे जाणार आहेत. तर मंगळवारी 16,00 यात्रेकरूंनी बर्फानी बाबांचे दर्शन घेतले आहे. 7500यात्रेकरूंना गेल्यावर्षी प्रमाणेच दररोज पहलगाम आणि बालटाल मार्गे पवित्र अमरनाथ गुहेकडे रवाना केले जाईल. शिवाय, दोन्ही बेस कॅम्पवर भाविकांसाठी हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आणखी वाचा
सुरतमध्ये सुरू झाला "क्राइंग क्लब"
तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी
अमरनाथची यात्रा 29 जूनला सुरू होऊन 7 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी समाप्त होईल. यंदा झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे बाबा बर्फानी (हिम शिवलिंग) आपल्या पूर्ण आकारात दर्शन देतील, असा भक्तांचा विश्वास आहे.