कार अपघातात नगरच्या व्यावसायिकाचा मृत्यू
By admin | Published: April 23, 2016 12:31 AM2016-04-23T00:31:54+5:302016-04-23T00:55:00+5:30
अहमदनगर : शुक्रवारी नगर येथील भाविकांच्या कारला कायगाव टोका (ता़ गंगापूर) येथे अपघात होऊन येथील व्यावसायिक संजय उर्फ रमणलाल झुंबरलाल भळगट (वय ४७) यांचा मृत्यू झाला.
अहमदनगर : औरंगाबाद जवळील भद्रा मारुती येथून दर्शन घेऊन परतत असताना शुक्रवारी नगर येथील भाविकांच्या कारला कायगाव टोका (ता़ गंगापूर) येथे अपघात होऊन येथील व्यावसायिक संजय उर्फ रमणलाल झुंबरलाल भळगट (वय ४७) यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य चौघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली़
हनुमान जयंतीनिमित्त औरंगाबादपासून जवळच असलेल्या भद्रा मारुती येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जातात़ गुुरुवारी शहरातील चितळेरोड येथील दिलीप शिंदे, राजेश सुंदरलाल राठोड, तेलीखुंट येथील किराणा दुकानदार संजय उर्फ रमणलाल भळगट, रोकडे व पुणे येथील त्यांचे मित्र असे पाच जण राजेश राठोड यांच्या इंडिगो मांझा कारने (एम़ एच़ १६, ए. जे. ७८७९) भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी गेले होते़ शुक्रवारी पहाटे दर्शन घेऊन ते नगरला परत येत होते़ त्यांची कार कायगाव टोका येथे आली असता, कारला मालट्रकने जोराची धडक दिली़ धडक दिल्यानंतर कार दुभाजकावर आदळली़ या घटनेत कारमधील सर्वजण जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ अपघातात भळगट हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला़ राजेश राठोड व दिलीप शिंदे यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले़ मयत भळगट यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़ घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला़
(प्रतिनिधी)