विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:53+5:302015-08-20T22:09:53+5:30
(फोटो-पासपोर्ट)
Next
(फ ोटो-पासपोर्ट)विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यूअर्थिंगला झाला स्पर्श : टोळापार शिवारातील घटनानरखेड : शेतात गुरांना बांधत असताना एल टी लाईनच्या अर्थिंगला स्पर्श झाला आणि जोरात विजेचा धक्का बसला. यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळापार शिवारात गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. शंकर वासुदेव बारस्कर (५०, रा. पिंपळगाव - वखाजी, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शंकर बारस्कर यांची टोळापार शिवारात शेती असून, ते गुरुवारी सकाळी शेतात गुरांना चारापाणी करण्यासाठी गेले होते. गुरांना बांधत अर्थिंगला स्पर्श झाला आणि जोरात विजेचा धक्का बसला. त्यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. टोळापार शिवारात ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. यातील काही तारा जिवंत असून, विजेच्या धक्क्याने जनावरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***