शतपावलीसाठी घराबाहेर पडला पती, काही क्षणात मोठा आवाज आला अन्...; पत्नीनं हंबरडा फोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:52 PM2022-04-07T19:52:05+5:302022-04-07T19:52:41+5:30

अलीकडेच दुबईमधून परतलेल्या चरणदीप सिंग यांच्या अचानक जाण्याने कुटुंब हादरले आहे.

Death of a person due to electric shock at Punjab | शतपावलीसाठी घराबाहेर पडला पती, काही क्षणात मोठा आवाज आला अन्...; पत्नीनं हंबरडा फोडला

शतपावलीसाठी घराबाहेर पडला पती, काही क्षणात मोठा आवाज आला अन्...; पत्नीनं हंबरडा फोडला

Next

चंडीगड – जेवल्यानंतर शतपावली करून येतो असं सांगून घरातून बाहेर पडलेला पती पुन्हा कधीच परतणार नाही हे समजताच पत्नीने हंबरडा फोडला. एखाद्याच्या आयुष्यात कधी काय वेळ येईल सांगता येत नाही. मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही याचाच प्रत्यय पंजाबच्या चंडीगडमध्ये आला आहे. बाहेर फिरण्यासाठी गेलेल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंजाबच्या जालंधरमधील सत करतार नगर पार्कमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे.

मृत चरणदीप सिंग घराच्या जवळ असलेल्या सत करतार नगरच्या पार्कमध्ये फिरण्यास गेले होते. याठिकाणी विद्युत तार उघड्यावर पडली होती. ती पाण्यात पडल्याने करंट पसरला. त्यामुळे पार्कमध्ये फिरण्यास गेलेल्या चरणदीप सिंग यांना विजेचा मोठा झटका बसला. त्यावेळीच जागीच त्यांचा मृत्यू झाला. पार्कमध्ये विद्युत काम सुरू असल्याचं चरणदीप यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

 पार्कमध्ये विद्युत तार उघड्यावर पडली होती. त्याचवेळी बागेतील माळीने झाडांना पाणी टाकलं होते. त्यामुळे विजेचा करंट हा पाण्यात आला. चरणदीप सिंग यांचे दुर्देव ते पार्कात फिरायला गेले तेव्हा त्यांचा पाय पाण्यात पडला आणि त्यांना विजेचा झटका बसला. मृत चरणदीप सिंग ३ महिन्यापूर्वीच दुबईमधून परत आले होते. चरणदीप सिंग यांच्या अचानक जाण्याने कुटुंब हादरले आहे. मृतकाची पत्नी मनजीत कौर आणि आई हरमीत कौर यांचे अश्रू अजिबात थांबत नव्हते. सर्व परिसरात या घटनेने शोककळा पसरली होती.

मृतकाची पत्नी चरणदीप सिंग यांची पत्नी मनजीत कौर यांनी सांगितले की, दररोज रात्री जेवण केल्यानंतर चरणदीप शतपावली घालण्यासाठी बाहेर जातात. नेहमीप्रमाणे बुधवारीही ते गेले होते. लवकर येतो असं सांगून घरातून बाहेर गेले. काही वेळाने मोठ्याने वाचवा असं आवाज ऐकायला आला. जोपर्यंत बाहेर जाऊन पाहणार तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पतीचा करंट लागल्याने मृत्यू झाला होता. घरी लवकर येतो सांगून गेले ते आता कधीच परतणार नाहीत असं पत्नीने सांगितले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई होणार असंही पोलिसांनी सांगितले आहे.   

Web Title: Death of a person due to electric shock at Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.