भयंकर! वडील आणि भावाच्या मृत्यूने खचलेल्या मुलाने घेतलं विष; धक्क्याने आईला आला हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 10:34 AM2023-05-18T10:34:20+5:302023-05-18T10:40:21+5:30

सुमारे दीड महिन्यानंतर पुन्हा नागेंद्र यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

death of father brother son died by poison mother suffered heart attack in shock | भयंकर! वडील आणि भावाच्या मृत्यूने खचलेल्या मुलाने घेतलं विष; धक्क्याने आईला आला हार्ट अटॅक

फोटो - आजतक

googlenewsNext

लखनौमध्ये घडलेल्या एका घटनेने लोकांना हादरवून सोडले. शहरातील त्रिवेणीनगर येथे राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलाचा हार्ट अटॅक मृत्यू झाल्याने दु:खी झालेल्या वडिलांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आता दीड महिन्यानंतर घरातील मोठ्या मुलाचाही विष प्राशन करून मृत्यू झाला. या धक्क्यात आईला हृदयविकाराचा झटका आला. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लखनौच्या त्रिवेणी नगरमधील मौसम बाग कॉलनीतील हे प्रकरण आहे. रिटायर्ड इंजिनिअर नागेंद्र प्रताप सिंह हे राहत होते. नागेंद्र प्रताप सिंह यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा त्यांच्या छोट्या नातवाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुसरीकडे, आपल्या मुलाच्या मृत्यूने हादरलेले वडील सूरज प्रताप सिंग यांनीही त्याच दिवशी आपल्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

सुमारे दीड महिन्यानंतर पुन्हा नागेंद्र यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आता त्यांच्या मोठ्या नातवाने विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवलं. दीड महिन्यापूर्वी पती आणि लहान मुलगा गमावल्याने सून दु:खात होती. आता जेव्हा तिला मोठ्या मुलाच्या निधनाची बातमी कळली तेव्हा ती कोलमडली. आपला एकमेव आधार गेल्याचा धक्का रुबीला सहन होत नव्हता आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. शेजाऱ्यांनी रुबीला शहरातील मिडलँड रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

इंजिनीअरिंग केलेल्या मोठ्या नातवाची लॉकडाऊन दरम्यान नोकरी गेली होती. तेव्हापासून तो लखनौच्या घरी राहत होता. याच दरम्यान, मार्चमध्ये वडील आणि भावाच्या मृत्यूने तो आणखी दु:खी झाला. सोमवारी उशिरापर्यंत झोपल्यानंतरही तो उठला नाही तेव्हा आईने त्याला उठवले. पण तो काहीच बोलला नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: death of father brother son died by poison mother suffered heart attack in shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.