अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून खून करणाऱ्यास २२ दिवसांत फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:48 AM2018-09-20T00:48:41+5:302018-09-20T00:49:30+5:30

घटना घडल्यापासून केवळ २२ दिवसांत तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले, तर न्यायालयाने पुढच्या २२ दिवसांतच खटल्याचे कामकाज पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

The death penalty is a 22-day death sentence for attempting rape of a minor girl | अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून खून करणाऱ्यास २२ दिवसांत फाशीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून खून करणाऱ्यास २२ दिवसांत फाशीची शिक्षा

Next

- खुशालचंद बाहेती 

नवी दिल्ली : १५ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिचा खून करणाºयास कोलार (कर्नाटक) न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. घटना घडल्यापासून केवळ २२ दिवसांत तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले, तर न्यायालयाने पुढच्या २२ दिवसांतच खटल्याचे कामकाज पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
टी.एन. सुरेशबाबू ऊर्फ सुरी याची एका अल्पवयीन मुलीवर वाईट नजर होती. यावरून मुलीच्या वडिलांचा व त्याचा वाद झाला. यामुळे तो सुडाने पेटला. १ आॅगस्ट २०१८ रोजी १५ वर्षांची ही मुलगी शाळेतील खेळाचे सामने संपवून एका मैत्रीणीसोबत घरी येत होती.
सुरेशबाबूने तिला रेल्वेरूळाजवळ पकडले. तिने ओरडताच तोंड दाबून धरले. तिची मैत्रीण घाबरून पळून गेली. त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने यास विरोध करताच दगडाने डोक्यावर व चेहºयावर मारले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिलारेल्वे रुळाजवळ टाकून तो पळाला. यामध्ये तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन ३ आॅगस्ट २०१८ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास २२ दिवसांत पूर्ण करून २३ आॅगस्ट रोजी भारतीय दंडविधान आणि पोक्सो कायद्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले. कोलार (कर्नाटक)च्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. रेखा यांनी २५ आॅगस्ट रोजी खटल्याचे कामकाज सुरू करून ७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले आणि १५ सप्टेंबर रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलीच्या गुन्ह्यात पोलीस आणि न्यायालय दोघांनीही दाखविलेली तत्परता उल्लेखनीय आहे. 
पोलिसांनी २२ दिवसांच्या तपासात अनेक पंचनामे, ३० पेक्षा जास्त साक्षीदारांकडे विचारपूस, फोरेन्सिक अहवाल, डीएनए तपासणी, ओळख परेड ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली. न्यायालयाने २२ दिवसांत चार्ज फे्रम केला. १५ साक्षीदार व ८४ कागदपत्रे तपासली आणि दोन्ही बाजंूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून खटला पूर्ण केला.

संभाव्य गंभीर धोक्याचा विचार करणे गरजेचे
शाळेत एकट्याने जाणाºया मुलींना असलेला धोका याचा गंभीर विचार होणे गरजेचे आहे. याबरोबरच मुलीच्या पालकांच्या वेदनांचाही विचार केला पाहिजे, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले. अशा गुन्ह्यात कठोर शिक्षा दिल्यास संभाव्य घटना टळू शकतात, हे स्पष्ट करून न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. पोलिसांच्या तत्पर आणि उत्कृष्ट तपासाचे न्यायालयाने निकालपत्रात कौतुक करताना अभियोग पक्षाने या प्रकरणात एकही उणीव ठेवली नाही, असे नमूद केले.

गुन्हा घडला १ आॅगस्ट
गुन्हा दाखल १ आॅगस्ट
आरोपी अटक ३ आॅगस्ट
दोषारोपपत्र दाखल २३ आॅगस्ट
खटला सुरू २५ आॅगस्ट
खटला पूर्ण ७ सप्टेंबर
शिक्षा १५ सप्टेंबर

Web Title: The death penalty is a 22-day death sentence for attempting rape of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.