दुचाकीच्या धडकेत रेल्वे कर्मचार्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2016 10:37 PM2016-04-10T22:37:57+5:302016-04-10T22:37:57+5:30
जळगाव: समोरुन भरधाव वेगाने येणार्या दुचाकीने प्रकाश ज्ञानदेव खडसे (वय ४५ रा.भुसावळ) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात खडसे यांचा मृत्यू झाला. हा अपघात सहा एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजता नशिराबादजवळ महामार्गावर झाला. खडसे हे भुसावळ येथील रहिंवाशी व जळगाव रेल्वे स्टेशनवरील आरक्षण कार्यालयात लिपिक होते.
Next
ज गाव: समोरुन भरधाव वेगाने येणार्या दुचाकीने प्रकाश ज्ञानदेव खडसे (वय ४५ रा.भुसावळ) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात खडसे यांचा मृत्यू झाला. हा अपघात सहा एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजता नशिराबादजवळ महामार्गावर झाला. खडसे हे भुसावळ येथील रहिंवाशी व जळगाव रेल्वे स्टेशनवरील आरक्षण कार्यालयात लिपिक होते. बुधवारी रात्री दहा वाजता ड्युटी संपल्यानंतर जळगाव भुसावळ येथे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.आर.९९६०) जात असताना नशिराबाद गावापासून काही अंतरावर समोरुन येणार्या दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.बी.१३०१) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असताना दुसर्या दिवशी सात एप्रिल रोजी दुपारी साडे बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,आई, वडील, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. गेल्या अनेक दिवसापासून जळगाव रेल्वे स्टेशनवर आरक्षण कार्यालयात लिपिक होते.