SBI च्या कॅशिअरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

By Admin | Published: November 14, 2016 10:20 AM2016-11-14T10:20:44+5:302016-11-14T10:20:44+5:30

५०० आणि १ हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बँकांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे रविवारीही सुट्टीच्या दिवशी देशभरातील बँका सुरु होत्या.

Death of SBI's Cashier Heart Attack | SBI च्या कॅशिअरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

SBI च्या कॅशिअरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

भोपाळ, दि. १४ - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅशियरचा रविवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. पुरुषोत्तम व्यास असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ४५ वर्षांचे होते. भोपाळच्या रतीबाद शाखेमध्ये काम करत असताना रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास पुरुषोत्तम यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. 
 
त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्यांचा मृत्यू झाला. ५०० आणि १ हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बँकांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे रविवारीही सुट्टीच्या दिवशी देशभरातील बँका सुरु होत्या. 
 
नोटा बदलण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी देशातील सर्वच बँकांसमोर मोठया रांगा लागल्या होत्या. बँकेचे कर्मचारी जास्तीत जास्त वेळ थांबून काम करत आहेत. 
 

Web Title: Death of SBI's Cashier Heart Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.