सात अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Published: October 7, 2016 06:23 AM2016-10-07T06:23:31+5:302016-10-07T06:23:31+5:30

काश्मीरच्या कुपवाडा हंडवाडा भागातील ३0, राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर पाक दहशतवाद्यांनी गुरुवारी पहाटे केलेला हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय जवानांनी जोरदार गोळीबार

Death of seven terrorists | सात अतिरेक्यांचा खात्मा

सात अतिरेक्यांचा खात्मा

Next

श्रीनगर : काश्मीरच्या कुपवाडा हंडवाडा भागातील ३0, राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर पाक दहशतवाद्यांनी गुरुवारी पहाटे केलेला हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय जवानांनी जोरदार गोळीबार केला. त्यात तीन दहशतवाद्यांना ठार मारले. तसेच आणखी तीन ठिकाणी झालेले दहशतवाद्यांनी केलेले घुसखोरीचे प्रयत्नही भारतीय सैन्याने उधळून लावले. नौगाम आणि रामपूर सेक्टरमधील तीन ठिकाणी घुसण्याचा दहशतवाद्यांनी केलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सैन्याने केलेल्या कारवाईत चार दहशतवादी ठार झाले.


लंगेटच्या कॅम्पवर हल्ला करण्यासाठी अतिरेकी पाकिस्तानमधूनच आले होते. त्यांच्याकडील सर्व अत्याधुनिक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय चलनही सापडले. त्यामुळे त्यांना स्थानिकांची मदत झाली असावी, असा अंदाज आहे. या अतिरेक्यांकडे पाकिस्तानची चिन्हे असलेली औषधेही होती. अतिरेक्यांनी पहाटे ५ वाजता कुपवाडा जिल्ह्यात लंगेट येथील राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. हा हल्ला उधळून लावल्यानंतर जवानांना तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले.

‘संपुआ’ सरकारच्या काळात केले गेले
चार वेळा ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ - पवार
यूपीए सरकारच्या काळातही चार वेळा पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक्स केले होते. पण त्याचा गवगवा केला नव्हता. अशा बाबी जाहीर करायच्या नसतात आणि त्याचे राजकारणही करायचे नसते, असे स्पष्ट करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आताच्या सर्जिकल स्ट्राइक्सचे व्हिडीओ फुटेज जारी करणे योग्य नाही, असे म्हटले आहे.

मी सरळ विचार करणारा माणूस आहे. पण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आला की मी वाकडाही विचार करू शकतो, असे सांगतानाच, सर्जिकल स्ट्राइक्सबद्दल शंका उपस्थित करणारे देशाशी एकनिष्ठ आहेत का, असा कधी कधी संशय येतो. - मनोहर पर्रीकर, केंद्रीय संरक्षणमंत्री

Web Title: Death of seven terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.