सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Published: July 12, 2017 07:31 AM2017-07-12T07:31:49+5:302017-07-12T07:50:19+5:30

बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे.

Death of three terrorists in encounter with security forces | सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Next

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 12 - बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. सुरक्षा जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खात्मा करण्यात आलेल्यांपैकी दोन दहशतवाद्यांची नावं दाऊद आणि जावेद अशी आहेत. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याची माहिती समोर येतेय. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बडगाममधल्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा जवानांनी राबवलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्याच वेळी जवानांनी प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
मंगळवारी रात्रीपासून सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात विस्फोटक शस्त्रसाठा आणि बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. सुरक्षा जवानांना मंगळवारी रात्री एका गावात दहशतवाद्यांना घेरलं होतं. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरूच होता. एका पोलीस अधिका-याच्या माहितीनुसार, सोमवारी अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. त्याचदरम्यान एका गावात तपासणी करत असताना मंगळवारी संध्याकाळी 7.30 वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याच वेळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दहशतवादी लपून बसलेल्या गावाला घेरलेल्या टीममध्ये सीआरपीएफ, लष्कराचं अँटी टेरर युनिट, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीरमधील पोलीस कर्मचा-यांचा समावेश होता. सीआरपीएफ अधिका-याच्या माहितीनुसार, 176 बटालियनचे जवान, राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीसोबत तपास अभियान राबवत असतानाच अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

संबंधित बातम्या

दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला"
अमरनाथ यात्रा हल्ला; बस चालक सलीमच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण

अबू इस्माईलच हल्ल्याचा सूत्रधार

दोन दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर लष्कर-ए-तय्यबानेच हल्ला घडवून आणला होता, अबू इस्माईल त्याचा मुख्य सूत्रधार होता, असे उघड झाले आहे. या हल्ल्यात प्रचंड मनुष्यहानी व्हावी, असा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. एकाच बसमध्ये 58 प्रवासी असल्याने तसे शक्य होते. पण बसचा चालक सलीम शेख याने गोळीबार सुरू असताना प्रसंगावधान दाखवून बस वेगाने पुढे नेल्याने अनेकांचे प्राण वाचले.
सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर तीन पोलिसांसह 32 जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस सलीम नावाचा चालक चालवत होता. बसचालक सलीमने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ही बस सापडल्यानंतरही चालकाने बस चालविणं सुरूच ठेवलं होतं. बसमध्ये असलेल्या यात्रेकरूंचा जीव वाचविण्यासाठी त्याने बस थांबवली नाही. जर सलीमने त्यावेळी बस थांबवली असती तर जिवीतहानी वाढली असती, अशी माहिती समोर येते आहे. गोळीबार होत असताना सलीमने बस चालवत ती सुरक्षादलाच्या कॅम्पपर्यंत पोहचवली. तेथिल काही यात्रेकरूंनीही सलीमने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.

Web Title: Death of three terrorists in encounter with security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.