दिल्लीतील गाजीपूरमध्ये कच-याचा ढिग कोसळला; घटनास्थळी बचावकार्य सुरु, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 06:54 PM2017-09-01T18:54:55+5:302017-09-01T19:15:29+5:30
दिल्लीच्या पूर्वेकडील भागात असलेल्या गाजीपूर येथील कच-याचा ढिग कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
दिल्ली, दि. 01 - दिल्लीच्या पूर्वेकडील भागात असलेल्या गाजीपूर येथील कच-याचा ढिग कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गाजीपूर येथे डंम्पिग ग्राऊंड आहे. येथील कच-याचा काही भाग कोंडली नाल्यामध्ये कोसळला. यावेळी नाल्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरुन जाणारी वाहने नाल्यात पडल्याने काही जण बुडल्याचे सांगण्यात येत आले. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, या नाल्यातून सहा जणांचा बाहेर काढण्यात आले असून यामध्ये दोन मृतांचा समावेेश आहे.
#LatestVisuals: Rescue operations underway in #Delhi's Ghazipur area where a garbage dump caved in. pic.twitter.com/GRMgGEbkfL
— ANI (@ANI) September 1, 2017
दिल्ली आणि गाझियाबादच्या सीमेवरील गाजीपूर डंम्पिग ग्राऊंडचा भाग आहे. या परिसरात सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास अनेक लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. येथील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कच-याचा काही भाग कोसळला, त्यावेळी मोठा आवाज आला. त्यानंतर कोसळलेला भाग एवढा मोठा होता की, नाल्याच्या बाजूला लावण्यात आलेली जाळी तुटून नाल्यात पडला.
#Visuals: Rescue operations underway in #Delhi's Ghazipur area where a garbage dump caved in. One team of NDRF moves to Ghazipur. pic.twitter.com/bFNmNgYJsN
— ANI (@ANI) September 1, 2017
No doubt it's serious concern, talked to LG about shifting landfill. Also asked compensation for those who died, he agreed: East Delhi MP pic.twitter.com/KMzEvFe6pu
— ANI (@ANI) September 1, 2017
Two bodies have been recovered, five persons rescued: Ajay Arora, SDM, Mayur Vihar. pic.twitter.com/8F20SChLJT
— ANI (@ANI) September 1, 2017