‘सीएए’ आंदोलनात सहभागी महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 03:30 AM2020-02-03T03:30:31+5:302020-02-03T03:31:08+5:30
शहराच्या एन्टेले भागात राहणाºया खातूनच्या मागे पती व नऊ मुले असा परिवार आहे.
कोलकाता : कोलकत्यातील ‘शाहीन बाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्क सर्कस येथे सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात गेला महिनाभर सुरू असलेल्या महिलांच्या ठिय्या आंदोलनात शनिवारी रात्री समिदा खातून नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला.
शहराच्या एन्टेले भागात राहणाºया खातूनच्या मागे पती व नऊ मुले असा परिवार आहे. तीव्र दम्याचा त्रास होत असूनही ही महिला नेटाने आंदोलनात सामील झाली होती व हृदयक्रिया बंद पडून तिचा मृत्यू झाला, असे आंदोलकांनी सांगितले. २५० महिलांचे हे आंदोलन ७ जानेवारीपासून सुरू आहे.
सांप्रदायिक तत्त्वांकडून वसाहतवाद नीतीचा अवलंब - पी. विजयन
सांप्रदायिक तत्त्वे आज सांप्रदायिकतेच्या आधारे जनतेत फूट पाडण्यासाठी ब्रिटिश वसाहतवाद नीतीचा वापर करीत आहेत. भारतीय स्वातंत्र्यांचा लढा वसाहतवादाविरुद्ध होता. आजची चळवळ वसातहवादाच्या समर्थकांविरुद्ध आहे, असे प्रतिपादन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले.
‘मुंबई कलेक्टिव्ह’ कार्यक्रमात सांप्रदायिकतेविरुद्ध राष्ट्रीय लढा’ या विषयावर बोलताना त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून केंद्रावर जोरदार निशाणा साधला. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यामागची कारणे स्पष्ट केली.
फूट पाडण्याचा प्रयत्न
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, पूर्वीही वसाहतवाद्यांनी सांप्रदायिकतेचा वापर करून लोकांत फूट पाडली. आजही सांप्रदायिक तत्त्वे याच नीतीचा अवलंब करीत आहेत. पहिले म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनात्मक मूल्यांविरुद्ध आहे. दुसरे, हा कायदा भेदभाव करणारा आणि मानवी हक्क डावलणारा आहे. तिसरे कारण म्हणजे हा कायदा संघ परिवाराच्या विचारसरणीचा असून हिंदू राष्ट्र लादण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. या कायद्याविरुद्ध आमचा संघर्ष जारी राहील.