नारळाचा झाडावरून पडून युवकाचा मृत्यू

By admin | Published: March 21, 2016 12:21 AM2016-03-21T00:21:27+5:302016-03-22T00:33:44+5:30

नाशिक : नारळ काढण्यासाठी झाडावर चढलेल्या युवकाचा पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर रोडवरील जोशीवाड्यातील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये शनिवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव देवानंद जनार्दन पवार (२३, रा़ कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी) असे आहे़

The death of the young man falls away from the coconut tree | नारळाचा झाडावरून पडून युवकाचा मृत्यू

नारळाचा झाडावरून पडून युवकाचा मृत्यू

Next

नाशिक : नारळ काढण्यासाठी झाडावर चढलेल्या युवकाचा पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर रोडवरील जोशीवाड्यातील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये शनिवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव देवानंद जनार्दन पवार (२३, रा़ कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी) असे आहे़
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवानंद व त्याचा भाऊ हे नागरिकांना झाडावरील नारळ उतरवून देण्याचे काम करतात़ शनिवारी दुपारच्या सुमारास देवानंद हा झाडावरील नारळ काढण्यासाठी शिवगंगा अपार्टमेंटमध्ये गेला होता़ या ठिकाणी असलेल्या झाडावरील नारळ काढत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या त्याच्या भावास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रविवारी (दि़२०) पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The death of the young man falls away from the coconut tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.