लॅपटॉप चार्ज करताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू
By admin | Published: May 23, 2016 08:45 AM2016-05-23T08:45:58+5:302016-05-23T08:50:37+5:30
लॅपटॉप चार्ज करतानाच त्यावर काम करणा-या तरूणाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - लॅपटॉप चार्ज करत असतानाचा त्याच्यावर काम करण्याची सवय जर तुम्हाला असेल तर तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालत आहात. कारण लॅपटॉप चार्ज करतानाच त्यावर काम करणं एका तरूणाला भलतंच महागात पडलं असून शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ब्रिजेश असे मृत तरूणाचे नाव असून अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि अवघ्या काही काळातच त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर व पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश हा फरिदाबादमधील (हरियाणा) एका एक्स्पोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. रविवारी ब्रिजेश व त्याची पत्नी खोलीत असताना ब्रिजेश लॅपटॉप चार्जिंगला लाऊन त्यावर काम करत होता. दुपारी अडीचच्या सुमारास त्याला अचानक शॉक लागल्याने ब्रिजेश बेशुद्ध पडला. कुटुंबियांनी ताताडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान पोलिसांनी ब्रिजेशचा लॅपटॉप हस्तगत केला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.