श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात तरूणाचा मृत्यू, परिसरात तणाव

By admin | Published: April 16, 2017 07:37 AM2017-04-16T07:37:10+5:302017-04-16T07:37:10+5:30

श्रीनगरमध्ये शनिवारी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला. तर, दुस-या घटनेत सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत पुलवामा येथे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी

Death of a youth in Srinagar firing by security guards, tension in the area | श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात तरूणाचा मृत्यू, परिसरात तणाव

श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात तरूणाचा मृत्यू, परिसरात तणाव

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 16 - श्रीनगरमध्ये शनिवारी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला. तर, दुस-या घटनेत सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत पुलवामा येथे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात सज्जाद अहमद या 22 वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे.  बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे.  
 
उत्तर काश्मिरच्या  बटमालू परिसरात  सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरूवात झाली, त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये सज्जादचा मृत्यू झाला असं स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी हे वृत्त खोडून काढत परिसरात सुरक्षा रक्षकांची तैनाती करण्यात आळी नव्हती आम्ही प्रकरणाची चौकशी करत आहोत असं म्हटलं आहे. 
 
तर, पुलवामा येथे एका स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  महाविद्यालयाबाहेर पोलीस चौकी बांधण्याचा विरोध करताना सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्यात आली. प्रत्युत्तरात जवानांनी अश्रु धूराच्या नळ्या सोडल्या त्यामुळे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.     
 
 
 

Web Title: Death of a youth in Srinagar firing by security guards, tension in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.