पाकशी गुप्त चर्चेवरून वाद उफाळला
By admin | Published: December 8, 2015 02:15 AM2015-12-08T02:15:16+5:302015-12-08T02:15:16+5:30
विदेशमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी इस्लामाबादमधील मंत्रिस्तरीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इस्लामाबादला जात असताना बँकॉक येथे रविवारी दोन देशांच्या सुरक्षा सल्लागारांनी
नवी दिल्ली/ इस्लामाबाद : विदेशमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी इस्लामाबादमधील मंत्रिस्तरीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इस्लामाबादला जात असताना बँकॉक येथे रविवारी दोन देशांच्या सुरक्षा सल्लागारांनी (एनएसए) गुप्त चर्चा केल्याचा आरोप करीत विरोधकांनी सरकारला संसदेत आणि बाहेर घेरण्यासाठी कंबर कसली आहे. अशा प्रकारची चर्चा म्हणजे देशाच्या मूलभूत धोरणाशी फारकत ठरते, अशी प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे.
बँकॉक येथे रविवारी दोन देशांच्या सुरक्षा सल्लागारांनी दहशतवाद तसेच जम्मू- काश्मीरसह द्विपक्षीय चर्चा करतानाच विधायक चर्चा सुरू ठेवण्याला सहमती दर्शविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे वाद उफळला आहे. सरकारने मागल्या दाराने चर्चा चालविल्याचा आरोप करीत विरोधकांनी सोमवारी संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. स्वराज या पाकचे विदेशमंत्री सरताज अजीज यांच्याशी चर्चा करणार आहेत.
इस्लामाबाद : भारत व पाकिस्तान संबंधातील कोंडी काहीशी सैल झाली असून, भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी होणाऱ्या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान संयुक्त चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेवर प्रामुख्याने भर दिला जाईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी सांगितले.