सेक्सच्या बदल्यात द्यायचा कर्जमाफी! संतापून पत्नीने केला खून

By admin | Published: April 13, 2017 02:39 PM2017-04-13T14:39:49+5:302017-04-13T14:39:49+5:30

कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरणाऱ्या महिलांना सेक्सच्या बदल्यात कर्जमाफी देणाऱ्या सावकाराचा पत्नीने खून केल्याची

Debt relief for sex! Angry wife murdered | सेक्सच्या बदल्यात द्यायचा कर्जमाफी! संतापून पत्नीने केला खून

सेक्सच्या बदल्यात द्यायचा कर्जमाफी! संतापून पत्नीने केला खून

Next
>ऑनलाइन लोकमत
 बंगळुरू, दि. 13 - कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरणाऱ्या महिलांना सेक्सच्या बदल्यात कर्जमाफी देणाऱ्या सावकाराचा पत्नीने खून केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह अन्य पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेला जी. कुमार हा आपल्या आसपासच्या लोकांना व्याजावर कर्जाऊ रक्कम देण्याचा व्यवसाय करत असे. त्याच्याकडून कर्ज घेणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असे. त्यापैकी ज्या महिलांना कर्जाची परतफेड करता येत नसे, त्यांना  कुमार हा आपल्यासोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडायचा. सेक्ससाठी तयार होणाऱ्या महिलांचे कर्जही तो माफ करायचा. 
कुमारच्या या कुकृत्यामुळे त्याची पत्नी डोरिन कुमार संतापली होती. त्याच्या अनेक महिलांशी असलेल्या अनैतिक संबंधांची माहितीही तिला होती. तिने जी. कुमारला सुधरण्यास बजावले होते. पण कुमारने तिचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे डोरिन हिने पतीला धडा शिकवण्याचे ठरवले. तिने काही लोकांसोबत मिळून जी. कुमारची हत्या करण्याचे षडयंत्र रचले.
कुमारने श्रीधर नावाच्या माणसाला 5 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. ज्यावेळी डोरिन आणि श्रीधर यांची ओळख झाली तेव्हा तिने तो आणि तिच्या पतीमधील संबंधाबाबत चर्चा केली. तिने श्रीधरकडे पतीच्या हत्येसाठी मदत मागितली. तसेच त्याबदल्यात श्रीधरचे कर्जही माफ करण्यास तयार झाली. त्याबरोबरच ती 30  लाख रुपये देण्यास तयार झाली. त्यापैकी दोन लाख रुपये तिने आगावू दिले होते.  
त्यानंतर श्रीधरने प्रभू नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला.  त्यांनी अजून तिघांची मदत घेतली. त्यानंतर कुमारच्या परिचयातील दोन महिलांना सांगून त्यांनी कुमारला एका दफनभूमीजवळ बोलावले. तेथे कुमार आपल्या दोस्तासह आल्यावर या सर्वांनी मिळून गेल्या आठवड्यात गुरुवारी जी. कुमार याची हत्या केली.  या प्रकरणी ईस्ट डिव्हिजन पोलिसांनी पेट्रिक पी. (25),  एस. प्रभू (35), एस. दिनेश (29) आणि एस. अविनाश (30) यांना अटक केली आहे.    

Web Title: Debt relief for sex! Angry wife murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.