दिवंगत सरबजीत सिंगच्या भगिनी दलबीर भाजपात
By admin | Published: December 26, 2016 12:56 AM2016-12-26T00:56:17+5:302016-12-26T00:56:17+5:30
दलबीर कौर यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पाकिस्तानी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावलेल्या सरबजीत सिंग या
नवी दिल्ली : दलबीर कौर यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पाकिस्तानी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावलेल्या सरबजीत सिंग या भारतीयाच्या दलबीर कौर या भगिनी होत.
सरबजीत सिंग यांचे लाहोरच्या तुरुंगात हृदयविकाराने २०१३ मध्ये निधन झाले. त्याच्या आधीच्या आठवड्यात त्यांच्यावर तुरुंगातील इतर कैद्यांकडून जबर हल्ला झाला होता.
१९९० मध्ये पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झालेल्या बाँबस्फोटांच्या मालिकेत सरबजीत सिंगचा हात असल्याच्या आरोपावरून त्याला दोषी ठरवण्यात आले होते. २३ वर्षांमध्ये दलबीर कौर या भावाला केवळ तीन वेळा तुरुंगात भेटू शकल्या. त्याची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले.