फसवणूक करणार्या महिलांच्या जामिनावर उद्या निर्णय
By admin | Published: July 13, 2016 12:15 AM2016-07-13T00:15:27+5:302016-07-13T00:15:27+5:30
जळगाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर १४ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.
Next
ज गाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर १४ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.नंदा जाधव हिच्या जामीन अर्जावर सोमवारी सरकार पक्षातर्फे खुलासा सादर करण्यात आला होता. तर दुसरी संशयित सविता साळुंके हिच्या जामीन अर्जावर मंगळवारी सरकारतर्फे खुलासा सादर करण्यात आला. दोघांच्या जामिनावर न्यायाधीश ए.के. पटणी यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला असून त्यावर १४ रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके तर संशयितांतर्फे ॲड.अकील इस्माइल व ॲड.आनंद मुजुमदार तसेच मूळ फिर्यादीतर्फे ॲड.एस.एल. भुसारी कामकाज पाहत आहेत.